Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

बसथांबे ते महापालिका इमारती… सौर ऊर्जेतून पुणे होणार हरित शहर

बसथांबे ते महापालिका इमारती… सौर ऊर्जेतून पुणे होणार हरित शहर

सार्वजनिक ठिकाणी सौर प्रकल्प राबवणार – महापौर मंजुषा नागपुरे; ‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६’चे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

marathinews24.com

पुणे – राज्यातील सर्वात मोठ्या ‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६’ या सौर ऊर्जा प्रदर्शनाचे उद्घाटन आज महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. शिवाजीनगर येथील न्यू अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड येथे सुरू असलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

भारतीय सैन्याला ‘संरक्षण’ सेना नव्हे तर ‘सशस्त्र’ सेना म्हणा-एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) – सविस्तर बातमी 

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर नागपुरे यांनी पुण्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले. बदलत्या हवामान परिस्थिती आणि वाढत्या ऊर्जा गरजांच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यावहारिक व अंमलात आणता येण्याजोगे सौर प्रकल्प राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सार्वजनिक ठिकाणे जसे की बसथांबे, उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये तसेच महापालिकेच्या इमारतींवर सौर पॅनेल्स बसवून ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते, असे त्या म्हणाल्या. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, सीसीटीव्ही यंत्रणा, डिजिटल माहिती फलक, मोबाईल चार्जिंग स्टेशन यांसारख्या सुविधा उभारल्यास शहर अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पारंपरिक विद्युत ऊर्जेवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रदूषणात घट घडवून आणण्यासाठी सौर ऊर्जेचा व्यापक वापर आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सौर ऊर्जा आणि इतर पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांचा समन्वय साधून पुण्याला हरित व स्वयंपूर्ण शहर बनविण्याचा संकल्प महापालिकेने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महापौर नागपुरे यांनी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून प्रायोगिक सौर प्रकल्प राबवून ते टप्प्याटप्प्याने शहरभर विस्तारण्याची तयारी दर्शवली. पुण्याच्या विकासासाठी महापालिका सकारात्मक पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेविका मंजुषा खेडेकर, स्वातंत्रवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर, जर्मन इंडो इनोवेशन कॉरिडोर (GIIC) चे संस्थापक उपेंद्र बर्वे, मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रदीप खाडे आणि माजी अध्यक्ष शशिकांत वाकडे उपस्थित होते.

प्रदर्शनात सौर ऊर्जा उत्पादनांबरोबरच महावितरण, महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी (मेडा) तसेच पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज विभागाचे स्टॉल्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विविध सौर उपकरणे, रूफटॉप सिस्टिम्स, बॅटरी साठवण उपाय आणि ऊर्जा बचत तंत्रज्ञानाबाबत नागरिक माहिती घेत आहेत.

हे प्रदर्शन आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून, सौर ऊर्जा क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती व खरेदीची संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×