Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

दरोड्यातील गुन्ह्यात फरार आरोपीला बेड्या

दरोड्यातील गुन्ह्यात फरार आरोपीला बेड्या

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दरोड्याच्या गुन्ह्यात एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो सातत्याने ठिकाण बदलून पोलिसांची नजर चुकवत होता. मुनवर उर्फ मुनीर शेख (वय ३९, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

इंटेरिअर डिझाईनचे काम पडले ८ लाखांना – सविस्तर बातमी 

गेल्या वर्षात स्टेशन परिसरात चौघांनी मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न करून गुन्हा केला होता. संबंधित गुन्ह्यात मुनवर उर्फ मुनीर शेख हा फरार झाला होता. वर्षभरापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. पण, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. तो सातत्याने ठिकाणा देखील बदलत असल्याचे तपासातून समोर आले होते. दरम्यान, माहिती घेत असताना पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड यांना मुनीर हा मालधक्का चौकात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लागलीच पथकाने सापळा रचून त्याला पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×