Breking News
किरकोळ वादातून केला मित्राचा खून‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलपुण्यात मेफेड्रॉनचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला बेड्यापालखी सोहळ्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणारतब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडी केलेल्या सराईताला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेटखरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीयजिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावातरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणीफ्लॅटचे कुलूप तोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीय

खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीय

वडगाव शेरीतील सराफी पेढीत चोरी

marathinews24.com

पुणे – खरेदीचा बहाणा करुन सराफी पेढीत चोरी करणारी टोळी शहरात सक्रीय झाली आहे. वडगाव शेरी भागातील सराफी पेढीत खरेदीचा बहाणा करुन दोन महिलांनी ६० हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना घडली. याबाबत सराफी पेढीतील कर्मचाऱ्याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यमात आला आहे.

तरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रस्त्यावर असलेल्या एका पेढीत कामाला आहेत. १२ जून रोजी रात्री आठच्या सुमारास दोन महिला खरेदीचा बहाण्याने सराफी पेढीत आल्या. त्यांनी तक्रारदाराला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगितले. तक्रारदाराला बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून ६० हजारांची अंगठी चोरुन महिला पसार झाल्या.

अशाच पद्धतीची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात असलेल्या एका सराफी पेढीत नुकतीच घडली. चोरट्या महिलांनी खरेदीच्या बहाण्याने सोन्याची चमकी लांबविली होती. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चंदननगर पोलिसांकडून पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top