बसमध्ये दागिने चोरणारी टोळी जेरबंद

विश्रामबाग Regularly कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरात पीएमपी बसमधील गर्दीत महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद घातला असताना विश्रामबाग पोलिसांना सोने चोरणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून तीन गुन्ह्यातील तब्बल पावणे सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात यश आले आहे.
बसवराज विजय सुतार (वय २५, रा. केशवनगर, मुंढवा) आणि कृष्णा रमेश माने (वय ४५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

महिला-मुलींच्या अपहरणाचे दृष्टचक्र – सविस्तर बातमी

शहरात पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना सातत्याने घटना घडत आहेत. यादरम्यान, वारजे बस स्टॉप ते शनिवार पेठ प्रवासात चोरट्यांनी एका महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरून नेली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा नोंद होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक तपास केला. तेव्हा बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा मुंढव्यातील बसवराज व कृष्णा यांनी केला आहे. त्यानूसार, त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. संशय बळावला. त्यांच्याकडे पुन्हा सखोल तपास केला असता त्यांनी वेगवेगळे आणखी दोन गुन्हे केल्याचे चौकशीतून समोर आले. त्यांच्याकडून ५ लाख ८६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदिप कसबे, पोलिस निरीक्षक अरूण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर, पोलिस अंमलदार सचिन कदम, शैलेश सुर्वे, अर्जुन थोरात व त्यांच्या पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×