Breking News
LokSamvad 2026 Baramati : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृतीफ्लॅटचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपासPune Crime : पसार झालेल्या फरार आरोपीला पकडलेPune Traffic Changes : गणेशोत्सवात पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीस बंदLokSamvad 2026 Pune : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; पुणे शहरात ‘लोकसंवाद’ उपक्रमाला प्रारंभPune Crime News : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीलाDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटीSantosh Pandit : पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित यांना जामीनसमाजात समानता, एकोपा सौख्य नांदावे; श्री गणरायाच्या चरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे साकडेविद्यार्थी वाहतूक करणार्‍या एसटीचा अपघात

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास

फ्लॅटचे कुलूप तोडून

घोले रस्ता परिसरातील फ्लॅटचे कुलूप तोडून ४ लाख ६२ हजारांचा ऐवज लंपास; सोन्याचे दागिने व एक लाखांची रोकड चोरीला

mrathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घोले रस्ता परिसरातील एका सोसायटीत घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पसार झालेल्या फरार आरोपीला पकडले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला घोले रस्त्यावरील दीपगौरी अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. १५ सप्टेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास त्या सदनिका बंद करुन बाहेर गेल्या होत्या. मध्यरात्री चोरट्यांनी सदनिकेचे फ्लॅटचे कुलूप तोडून तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज लांबविला. बुधवारी (१६ सप्टेंबर) सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्या परतल्या. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक घाटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×