Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन

देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत संचलन

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यम, व्यवस्थापन आणि अभ्यास मंडळांच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत ‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याचा बालेवाडी येथे शुभारंभ – सविस्तर बातमी

“राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर आधारित सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्याविषयी जागृती व शारीरिक व्यायामाची आवड निर्माण करणे हा आहे. या कार्यक्रमासाठी शाळास्तरावर पूर्वतयारी जोरात सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शाळेच्या ध्वजारोहणानंतर साधारण एक तास कालावधीसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन, संगीत कवायत व प्रात्यक्षिके आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सामूहिक स्वरूपाचा कार्यक्रम असल्याने उपलब्ध मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी, समाजसेवी व अन्य मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार असून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. यावेळी विशेष नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. सर्व शाळांनी कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×