पासपोर्ट कार्यालयाकडून पोलीस पडताळणीबाबत मार्गदर्शन

पासपोर्ट कार्यालयाकडून पोलीस पडताळणीबाबत मार्गदर्शन

पोलीस अधिकाऱ्यांना पडताळणी प्रक्रिया अधिक अचूक आणि जलदगतीने करण्याबाबत मार्गदर्शन

marathinews24.com

पुणे – पारपत्र कार्यालयाकडून पोलीस पडताळणीबाबत विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्यालयात पार पडलेल्या प्रशिक्षण सत्रात पोलीस अधिकाऱ्यांना पडताळणी प्रक्रिया अधिक अचूक आणि जलदगतीने करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोथरूड गोळीबार प्रकरणातील गुंड नीलेश घायवळ हा बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून परदेशात गेल्याचे उघडकीस आले. अहिल्यानगरमधील पत्ता त्याने पारपत्र मिळवण्यासाठी दिला होता. घायवळ याच्या साथीदाराने दलालामार्फत बनावट पत्ता सादर करुन पारपत्र मिळविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

पुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्या – सविस्तर बातमी 

बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळविण्याच्या घटना रोखण्यासाठी पारपत्र कार्यालयाने पोलीस आयुक्तालायत बुधवारी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण सत्रात पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. प्रादेशिक पारपत्र अधिकारी विनोद गायकवाड, उपअधिकारी श्रृती पांडे, पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.

पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी पोलीस आयुक्यालयातील पारपत्र पडताळणी विभागाच्या कामकाजाची माहिती पारपत्र अधिकाऱ्यांना दिली. ‘पारपत्र पडताळणी अचूक पद्धतीने करण्याबाबत तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पारपत्र पडताळणी जलदगतीने, तसेच अचूक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने पडताळणी विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत’, असे त्यांनी नमूद केले.

‘परराष्ट्र मंत्रालयाकडून पारपत्र पडताळणी आधिक पारपदर्शक आणि अचूक हाेण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. अचूक आणि जलदगतीने पडताळणी करणे हा पारपत्र सेवेतील महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही पडताळणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे’, असे पारपत्र अधिकारी विनोद गायकवाड यांनी सांगितले. उपअधिकारी श्रृती पांडे यांनी पारपत्र सेवा संगणकीय प्रणालीची माहिती दिली. अत्याधुनिक प्रणालीमुळे पारपत्र मिळवण्याची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि अचूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील अडचणी, तांत्रिक बाबींबाबत शंकाचे निरसन या वेळी करण्यत आले. पोलीस निरीक्षक सविता घनवट यांनी आभार प्रदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×