Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

कारागृहातून बाहेर आला अन गांजा विक्री करू लागला

पुण्यात सराइताकडून १० किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थ विक्री प्रकरणात कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या सराइताकडून गांजा विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकारनगर पोलिसांनी सराइताला अटक केली असून, त्याच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचा १० किलो गांजा जप्त करण्यात आला. प्रसाद गणेश हारपुडे (वय २५, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गणेशोत्सवात गांजा विक्रीसाठी पुण्यात आलेल्या तस्कराला अटक – सविस्तर बातमी

सराईत हारपुडे याच्याविरुद्ध यापूर्वी अमली पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात तो कारागृहात होता. न्यायालायाकडून जामीन मिळवून बाहेर आलेल्या हारपुडे याने पुन्हा गांजा विक्री सुरू केली होती. पुणे-सातारा रस्त्यावरील मोरे वस्ती भागात सहकारनगर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस हवालदार अमोल पवार आणि अभिजीत वालगुडे यांनी हारपुडेला पाहिले. पोलिसांना पाहताच तो पसार होण्याच्या तयारीत होता. सापळा लावून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत दहा किलो १३८ ग्रॅम गांजा सापडला. हारपुडेकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण, सहायक निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर, सहायक फौजदार बापू खुटवड, अमोल पवार, अमोल पवार, अभिजित वालगुडे, बजरंग पवार, सागर सुतकर, निखील राजवाडे, किरण कांबळे, संजय म्हस्के, अशोक ढावरे, अमित पद्मनाळे, महेश भगत, सत्यवान बाठे, रवी कदम यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×