Breking News
३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहनवाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहनपुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटलेजिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभप्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनपोलीस आयुक्त कडाडले, बेशिस्तांना कायमस्वरूपी धडा शिकवणारपिंपरी चिंचवड परिवहन कार्यक्षेत्रातील 123 ऑटोरिक्षा स्टॅंण्डना मान्यतापुणे : टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूण ठारएसटी प्रवासात महिलेचे ४ लाखांचे दागिने चोरीलातब्बल २ हजार ६५ लीटर गावठी दारू जप्त

हवाई दलाच्या जवानाच्या वेशात करत होता वावर

संबंधित व्यक्तीला पुण्यात अटक

marathinews24.com

पुणे – हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गौरवकुमार दिनेश कुमार (वय -२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत आरोपीला अटक केली आहे.

इनोव्हा कार चालकाने मुलाला चिरडले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव कुमार याच्या संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला अडवण्यात आले. सखोल पडताळणीसह निगराणीच्या प्रक्रियेनंतर, दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने १८ मे रोजी रात्री पावणे नऊ वाजता खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त केले आहे.

ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट असे साहित्य त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत. अधिक तपशील लवकरच उपलब्ध होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top