Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त विशेष टपाल प्रेझेंटेशन पॅकचे पुण्यात प्रकाशन

पुणे महानगरपालिकेत महापौरांच्या हस्ते विशेष टपाल पॅकचे अनावरण

marathinews24.com

पुणे – गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या टपाल विभागामार्फत विशेष प्रेझेंटेशन पॅक जारी करण्यात आला असून त्याचे औपचारिक प्रकाशन शुक्रवारी पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले.

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी-महेश भागवत – सविस्तर बातमी

या प्रेझेंटेशन पॅकचे अनावरण पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते तसेच उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शीख गुरुद्वारा असोसिएशनचे अध्यक्ष सरदार संतसिंगजी मोखा, गुरुद्वारा गुरु नानक दरबारचे अध्यक्ष सरदार चरणजितसिंग साहनी, सिंह सभा देहूरोडचे अध्यक्ष सरदार गुरमीतसिंग रट्टू, गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभाचे अध्यक्ष सरदार भोला सिंग अरोरा, रमिन्दर सिंघ राजपाल, डॉ. रणजीत सिंघ अरोरा, एन. पी. सिंग बक्षी, एस. एस. लबाना, बलजीत सिंग, शक्ती सिंग कल्याणी तसेच विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी, पुणे महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शीख, लबाना, सिकलीगर , बंजारा, सिंधी, वाल्मिकी समाज तसेच इतर अल्पसंख्याक समाजांच्या पदाधिकाऱ्यांना मा. महापौर व उपमहापौर यांनी येऊ घातलेल्या “हिंद दी चादर-श्री गुरु तेग बहादूर जी ३५० वे शहीदी समागम” या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निमंत्रित केले.

सदर शहीदी समागम २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून राज्यभरातील तसेच इतर भागांतील भाविक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

धर्मस्वातंत्र्य व मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ “हिंद दी चादर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर जी यांना ही अभिवादनात्मक श्रद्धांजली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×