माण डेपो ते पीएमआर-४ स्थानकादरम्यान मेट्रोची पहिली चाचणी धाव यशस्वी
marathinews24.com
पुणे – Pune Metro : शहरातील आयटी हब आणि मध्यवर्ती भाग जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. ४ जुलैला माण डेपो ते पीएमआर-४ स्थानकादरम्यान मेट्रोची पहिली चाचणी धाव यशस्वीरित्या पार पडली. हा २३.३ किमी लांबीचा पूर्णतः उन्नत मेट्रो मार्ग २३ स्थानकांसह तयार होत असून प्रकल्पाची एकूण ८७% प्रगती झाली आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात असून हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य आहे.
माणूसपण देणारी भारतीय विचारसरणी महत्त्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी – सविस्तर बातमी
प्रकल्पाची अंमलबजावणी पीएमआरडीए, टाटा आणि सिमेन्स समूह यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलअंतर्गत ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ मार्फत केली जात आहे. संबंधित मार्गासाठी चार वातानुकूलित मेट्रो ट्रेन सेट पुण्यात दाखल झाले असून प्रत्येक ट्रेनमध्ये ३ डब्बे आणि एकूण १००० प्रवाशांची क्षमता आहे. या गाड्या ८० किमी प्रतितास वेगाने धावणार आहेत. ही ट्रायल रन म्हणजे मेट्रोच्या यशस्वी कार्यान्वयनाच्या दिशेने एक भक्कम पाऊल असून, पुणेकरांसाठी ही जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची नवी दिशा ठरणार आहे.