Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

जेजुरीजवळ भीषण अपघात; ३ वारकरी महिलांचा मृत्यू, चार जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; ३ वारकरी महिलांचा मृत्यू, चार जखमी

पालखी सोहळ्यात दुर्दैवी घटना; ट्रकची धडक बसून तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी

marathinews24.com

पुणे – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सोमवारी (दि. १३ ) सकाळी दिंड्या जेजुरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना भीषण अपघात झाला आहे. दिंडीतील ट्रक थेट वारकरी महिलांच्या अंगावर आल्यामुळे झालेल्या अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, ४ महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत. बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा अपघात घडला.

हडपसर गाडीतळावरील पालखी तळावर चोरट्यांचा सुळसुळाट – सविस्तर बातमी 

आषाढी वारीदरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीचा ट्रकचालकाने सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील ७ महिला वारकरी महिलांना धडक दिली. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून चार महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मदतकार्य सुरू असून पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×