Breking News
Yerawada Sex Racket : हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाशLokSamvad 2026 Baramati : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृतीफ्लॅटचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपासPune Crime : पसार झालेल्या फरार आरोपीला पकडलेPune Traffic Changes : गणेशोत्सवात पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीस बंदLokSamvad 2026 Pune : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; पुणे शहरात ‘लोकसंवाद’ उपक्रमाला प्रारंभPune Crime News : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीलाDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटीSantosh Pandit : पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित यांना जामीनसमाजात समानता, एकोपा सौख्य नांदावे; श्री गणरायाच्या चरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे साकडे

Yerawada Sex Racket : हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश

येरवडा पोलिसांची कारवाई; दोघांना अटक, दोन पीडित महिलांची सुटका

marathinews24.com

पुणे – हॉटेलमध्ये ग्राहकांना फोनवरून मुली पुरवून अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर येरवडा पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून देह व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, (Yerawada Sex Racket) दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. खराडी परिसरातील हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. राज राजेशाम सविता (२८, रा. खराडी) आणि सुनील शिवाजी शिंदे (३७, रा. काळेपडळ, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत.

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस हवालदार रमेश नवलेना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत याबाबत माहिती मिळाली होती. एका हॉटेलमध्ये एक इसम व त्याचा साथीदार ग्राहकांना फोनवरून मुली पुरवून अनैतिक व्यापार करत असल्याचे समोर आले. ग्राहकांच्या मागणीनुसार खराडी, येरवडा परिसरातील लॉजवर मुलींना पाठविले जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.
ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गिते यांना कळवण्यात आली. त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकून अनैतिक व्यापारासाठी आणलेल्या दोन पीडित महिलांची सुटका केली. (Yerawada Sex Racket)

कारवाईदरम्यान पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलिस अंमलदार रमेश नवले, पोलिस हवालदार कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, सागर ढवळी, लक्ष्मण ढोकळ, नितीन चांदणे, नागेश कुंजटवाड, प्रशांत कांबळे, साईनाथ हुरहाके, नटराज सुतार, संदीप धाडवड, ज्योती नाईक यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×