बातमीच्या पलिकडे जाऊन पत्रकाराने केलेली अशीही मदत
marathinews24.com
पुणे – पत्रकारिता क्षेत्रात असल्याने रोज ॲग्रोवन दैनिकांसाठी शेतीसंदर्भात नवनवीन विषय घेऊन बातम्या करत असतो. मात्र, यापूर्वी फारसं कधीही अनुभव मांडले नव्हते. आज पहिल्यांदाच वेगळ लिहावंस वाटलं, त्याच कारणही तसच खास.. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये पोलिसांकडून शेतकऱ्यांचा झालेला छळ, तसा तो शेतीमालाच्या वाहतुक अडवणुकीच्या निमित्ताने रोज सुरू होता. परंतु हा छळ म्हणजे पोलिसांमध्ये तयार झालेला इगो अन त्यातून स्वतःला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात केलेलं लॉकडाऊन असा झालेला प्रवास सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे आम्हा पत्रकारांच वर्क फ्रॉम वर्क चालू होतं. दररोज घरीच असल्याने दररोज बातम्या देताना अडचणी येत होत्या. त्यामुळे रोज शेतकर्यांशी बोलणं, अडचणी समजून घेणं आणि त्यावर बातम्या तयार करून देणं हा दर रोजचा नित्यक्रम सुरू होता.
धरणातील गाळ काढण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करावे; मंत्री – राधाकृष्ण विखे पाटील – सविस्तर बातमी8
वार मंगळवार (ता.२१ एप्रिल २०२५) नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर रोजचा दैनंदिन कार्यक्रम आटोपून बातम्या संदर्भात शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यानंतर माहितीच्या आधारावर बातम्या देणं सुरू झाल. पहिली बातमी दिल्यानंतर दुसरी बातमी करण्याचे काम हाती घेतले. दुपारी शिरूर बाजार समितीने केलेल्या व्हॉट्स ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होत असलेल्या फायद्यासंदर्भात बातमी करत असताना शेतकऱ्यांशी बोलावं म्हणून पहिल्यांदा नितीन थोरात या शेतकऱ्यांशी बोललो. त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याशी बोलावं म्हणून वाडेगव्हाणमधील बेलवंडी फाटा (जि. नगर) येथील शेतीत उतरलेले नवीन सुशिक्षित शेतकरी दिपक खंदारे यांना फोन केला. फोन करण्याचे कारणही तसेच होते. ते नगर व पुणे जिल्हयाच्या हद्दीवर असल्याने ते आपला शेतमाल विक्रीसाठी शिरूर मार्केट जवळ असल्याने येथेच नेहमी विक्री करतात.
सात ते आठ वर्षापूर्वी या शेतकऱ्यांची शेवगा पिकाविषयीची यशोगाथा अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध केल्याने ते कायम संपर्कात राहत होते. परंतु, मागील एक काही वर्षापासून बदलत्या हवामानामुळे शेतीत बदल करून पाँलिहाऊसमध्ये काकडीचे पीक घेत आहेत. या काकडीची शिरूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आणून ते विक्री करत आहेत. कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने शेतकरी अडचणीत होते. तरीही त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी शिरूर बाजार समितीचे सभापती माजी शशिकांत दसगुडे यांच्याशी चर्चा करून शेतमाल विक्रीसाठी बाजार समिती सुरू करण्याची विनंती केली. शेतकर्यांची अडचण लक्षात घेऊन बाजार समितीनेही भाजीपाला विक्रीसाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ग्राहकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांसाठी विक्रीची व्यवस्था बाजार समितीच्या बाहेर करण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील काही शेतकरी आपला शेतमाल घेऊन विक्री करत आहेत, असा अडचणीचा अनुभव त्यांनी सांगितला.
फोनवर बोलत असताना घाबरत असल्याचे लक्षात आल्याने अधिक माहिती विचारात पुढे वैयक्तिक आलेला खरा अनुभव वेगळाच असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. त्यांना सहा दिवसापासून बेलवंडी येथील एका पोलिसांकडून त्रास होत असल्याची कैफियत मांडली. केवळ दोन किलो काकडी फुकट दिली नाही या रागाने तो पोलिस त्रास देत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. दोन दिवसांपूर्वी पोलिसाकडून त्रास झाल्याचे सांगितले. सतत फोन करुन पोलिस ठाण्यात बोलवत आहेत. मारहाण करणार असल्याचे सांगत आहेत. लोकप्रतिनिधींना (माजी आमदार निलेश लंके) कळवले तर त्यांनीही फारशी दखल घेतली नाही. पाच- सहा दिवसापासून शेतातच मुक्काम असल्याचे सांगताना ते रडत होते. मी सर्व सामान्य शेतकरी असून माझ्या शेतामध्ये काकडी, पेरू, डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रोज काकडीचे ३० ते ३५ क्रेट फेकून दयावे लागतात. मला मानसिक त्रास होऊ लागला आहे. मी पोलीस प्रशासनाला कंटाळलो आहे. उद्या माझे काही बरे वाईट झाल्यास बेलवंडी पोलिस जबाबदार राहतील असे रडून सांगितले.
पत्रकार असल्याने मी एकूणच शेतकऱ्यांची झालेली स्थिती लक्षात घेऊन रात्रीच एका वरिष्ठ सेवानिवृत्त झालेल्या पोलिस उपआयुक्ताशी या संदर्भात चर्चा केली. त्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर संबधित जिल्हा पोलिस अधिक्षक अधिकारी यांना ही बाब सांगा असे सांगून दुसऱ्यांचा फोन आला म्हणून कट केला. त्यानंतर रात्री कोणी मदत करील की नाही, म्हणून नगरमधील पत्रकार मित्रालाही झाला प्रकार सांगितला. नगरमधील ॲग्रोवनचे सहकारी सूर्यकांत नेटके यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक अधिकारी यांना पत्र देऊन माहिती कळव म्हणून सांगितले. तसे मी सुद्धा शेतकऱ्यांला दुपारी पत्र तयार करून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक अधिकारी, आमदार, तहसीलदार, पत्रकार यांना देण्याचे सांगितले. परंतु एकंदरीत शेतकऱ्यांची झालेली अवस्था पाहून त्यांनी ते बहुतेक टाळले असावे. मात्र, रात्री पुन्हा फोनकरून अर्ज तयार करून ते देण्याचे सांगितले. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतातच रात्री तीन वाजेपर्यत जागत राहून मोबाईलवरील हॉट्स अँपवर पत्र तयार करून मला टाकले.
मी बुधवारी सकाळी उठल्यानंतर ते पत्र व्हाट्स अँपवर बघितल्यानंतर दुरूस्त करून पुन्हा त्यांना ते टाकले. त्यानंतर ते कृषी आयुक्त, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक अधिकारी, पत्रकार अशा सर्वांना ते टाकण्याचे सांगितले. मात्र, सर्वांचे संपर्क क्रमांक नसल्याने अडचणी येत होत्या. अनेकांना फोन करून संपर्क क्रमांक मिळत नसल्याने पुन्हा मला फोन केला. मी कृषी आयुक्त यांचा संपर्क क्रमांक देऊन त्यांना पत्र टाकण्याचे सांगितले. मात्र, रात्रभर एकूण झालेली शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन अखेर नाईलाजास्तव मदत करण्याचे ठरविले.
नेहमीप्रमाणे संपर्कात असलेले त्यावेळचे कृषी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, नगर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांना व्हॅाट्सॲपवर पोस्ट टाकून माहिती दिली. त्यात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. एकूणच पत्रकार म्हणून नेहमीच कृषी विभागाच्या विरोधात बातम्या केल्या आहेत. काही वेळा सकारात्मक बातम्या केल्या होत्या. त्यामुळे लाँकडाऊनच्या काळात या शेतकऱ्य़ासंबधी तातडीने लक्ष घालतील की नाही ही मोठी शंका होती. कारण पत्रकार म्हणून त्यासंदर्भात बातमी केली असती तर ती दुसऱ्या दिवशी छापून आली असती.
त्यानंतर प्रशासकीय पातळीवरून हालचाली होतील, नाही झाल्यातर, ती पण एक शंका होतीच. सूर्यकांत नेटके यांना बातमी करण्याची विनंती केली. या घाई गडबडीत मी ही माझ्या बातम्या तयार करून आँफीसला पाठविल्या. याचवेळेत अधिकारी यांच्याशी फोन करून संबधित शेतकऱ्यांला होणाऱ्या त्रासाबद्दल लक्ष घालण्याची विनंती फोन करून दिली. त्यास कृषी आयुक्त आणि विभागीय सहसंचालक यांना संबधित बाब गंभीर असल्याचे लक्षात आणून दिली. त्यानंतर विभागीय सहसंचालक यांनी मिटींगमध्ये व्यस्त असताना त्यांनी मला फोन करून मी स्वतःहा लक्ष घालत असल्याचे सांगितले.
कृषी आयु्क्त यांनी जिल्हाधिकारी तर विभागीय कृषी सहसंचालक यांनी नगर अधिक्षक कृषी अधिकारी यांना संपर्क करून माहितीची पूर्वकल्पना दिली. त्यापूर्वी मीही नगर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांना माहिती दिली होती. त्यानंतर नगर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनीही मला फोन करून या गोष्टीत मी स्वतःहा लक्ष घालून पारनेर तहसीलदार देवरे मॅडमशी बोलत असल्याचे आश्वासन दिले. त्यातच डीवायएसपी व जिल्हाधिकारी यांच्याही निदर्शनास ही बाब आणून देण्याची विनंती केली. मात्र, लाँकडाऊन असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक अधिकारी यांना जास्त त्रास नको, म्हणून त्यांनी स्वतःहाच तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर व तहसीलदार यांना फोन करून कल्पना दिली. त्याला तहसीलदार यांनीही प्रतिसाद देत तुम्ही येत असेल तर मी लगेच येत असल्याचे त्यांना मला सांगितले.
तातडीने तिन्ही अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत अवघ्या एक ते दोन तासात शेतकऱ्यांच्या घरी गेले. मात्र, रात्रीपासून शेतकरी शेतातील ऊसामध्ये जाऊन लपल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर या तीनही अधिकाऱ्यांनी शेतातील ऊसामध्ये जाऊन घरी आणले. त्यामुळे शेतकऱ्याला धीर मिळाल्यानंतर तहसीलदार देवरे यांनी संबधित बेलवंडी येथील पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांला त्रास न देण्याचे खडेबोल सुनावले. त्यानंतर संबधित जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी मला फोन करून शेतकऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करण्याची विनंती केली. शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना साहेब खूपच आधार मिळाला. तहसीलदार मॅडम थेट बोलल्यामुळे आता काही अडचण येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर संबधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी शेतात उभा केलेल्या पॉलिहाऊसमधील काकडीची पाहणी करून शेतकऱ्यांचे कौतुक केले. शेतकऱ्याला काकडीच्या विक्रीसाठी जाग्यावरच वाहतुकीचा अत्यावश्यक परवाना देऊन काकडीची विक्री करण्याचे सांगितले. त्यानंतर साहेब तुम्ही लक्ष वरिष्ठ पातळीवरून झालेल्या हालचालीमुळे तिन्ही अधिकाऱ्यांनी घरी येऊन होणाऱ्या त्रासाबद्दल आधार दिल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे फोन करून सायंकाळी पुन्हा सांगितले.
लेखक-संदीप नवले हे पुणे सकाळ ॲग्रोवनचे रिपोर्टर आहेत.