Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक, नातेवाईकांवर गुन्हा

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक, नातेवाईकांवर गुन्हा

मुलासह इमारतीतून उडी मारून केली होती आत्महत्या

marathinews24.com

पुणे – सासरच्या छळाला कंटाळून ६ वर्षांच्या मुलासह इमारतीवरून उडी मारून पत्नीाल आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पतीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १८ जूनला आंबेगाव बुद्रूकमधील दळवीनगरातील कल्पकसृष्टी इमारतीत घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने लिहिलेल्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. शशिकांत त्र्यंबकराव देशमुख वय ३८ रा. दळवीनगर, आंबेगाव बुद्रूक असे अटक केलेल्या पतीने नाव आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१), विष्णू शशिकांत देशमुख (वय ६) अशी मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी ठार, बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत बालवाडीत शिक्षिक होत्या. त्यांचे पती शशिकांत हे बँकेत नोकरी करतात. बुधवारी दि. १८ सायंकाळी सहाच्या सुमारास मयुरीने सहा वर्षांचा मुलगा विष्णू याच्यासह पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यावेळी मयुरीचे पती घरात नव्हते. आवाज झाल्यानंतर सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा मयुरी आणि त्यांचा मुलगा विष्णू हे सोसायटीतील आवाारात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पती शशिकांत, सासू इतर नातेवाईकांकडून होणार्‍या छळाला कंटाळून मयुरीने आत्महत्या केली. सततचा संशय, शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटीमुळे तिने मुलासह आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एपीआय स्वाती देवधर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×