डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी ठार

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी ठार

बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून,दुसरी तरूणी जखमी झाली. हा अपघात गुरूवारी (दि. १९) संध्याकाळी पाचच्या बाणेर परिसरात घडला आहे. याप्रकरणी डंपर चालक राहुल भिमराव राठोड (वय २४, रा. भोंडवे वस्ती, रावेत) याला अटक करण्यात आला आहे. तेजल प्रकाश तायडे (२७, रा. तलासरी, जि. ठाणे) असे मयत तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी प्राची जगन्नाथ पचांगे (वय २८, रा. डांगे चौक)हिने फिर्याद दिली आहे.

वाहनांवर ‘एचएसआरपी’बसविण्याकरीता १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची आणि तेजल दुचाकीवरून गुरूवारी (दि. १९) संध्याकाळी पाचच्या सुमरास गणेश मंदीर चौकातून हॉस्पिटलकडे जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपर चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिला धडकेत तेजल गंभीर जखमी झाली, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डंपर चालक राहुल हा कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला. अपघातात प्राचीच्या हाताला, कपाळावर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केकाण करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×