पुणे विमानतळावर पकडला ३४ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा

 पुणे विमानतळावर २६ कोटी ८० लाखांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त

बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत तब्बल ९६० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) जप्त केला आहे. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

डोंबिवली अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी – सविस्तर बातमी

कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे झोनच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी संशयावरून बँकॉकहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या आयएक्स २४१ या विमानाने आलेल्या प्रवाशाची तपासणी केली. तपासादरम्यान त्याच्या हँडबॅगमध्ये लपवून ठेवलेले हायड्रोपोनिक गांजाचे दोन पारदर्शक व्हॅक्युम सीलबंद पॅकेट्स आढळून आले.

दोन्ही पॅकेट्स आतून कार्बन पेपरमध्ये गुंडाळून चतुराईने लपवण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे ३३.६० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित प्रवाशाला अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून या मागील आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×