Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पाचे बेकायदेशीर बांधकाम; तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पाचे बेकायदेशीर बांधकाम; तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

विभागीय आयुक्तांनी स्थळभेट देऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

marathinews24.com

मुंबई – पुणे येथील नॅन्सी लेक होम प्रकल्पाला सन-2004 नंतर आतापर्यंत जवळपास 10 वेळा सुधारित मान्यता देण्यात आली असून गाव नकाशा आणि मोजणी नकाशा मध्ये सर्व्हे क्र.08 आणि 09 च्या स्थानांमध्ये फेरबदल केले गेल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, पुणे यांनी भूमी अभिलेख विभागासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्थळभेट द्यावी आणि सखोल चौकशी करुन 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. आज दिनांक 29 ऑक्टोबर, 2025 रोजी विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली नॅन्सी लेक होम सर्व्हे नं.08, कात्रज, पुणे येथे विकासकाने बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी हे निर्देश देण्यात आले.

म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडेच पालटले; चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार – सविस्तर बातमी 

या प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी, पुणे यांनी बिगरशेती आदेशामध्ये 37,973.20 चौ.मी. क्षेत्रफळासाठी बांधकाम परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात 60,630.59 चौ.मी. क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले आहे किंवा कसे, वारंवार नकाशात बदल करण्याची कारणे काय आहेत, असे प्रश्न या बैठकीप्रसंगी उपस्थित करण्यात आले. याबाबत संबंधित अधिकारी यांचेकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना यासंदर्भात स्थळभेट देऊन चौकशी करणे आणि 15 दिवसांच्या आत अहवाल देण्याबाबतचे निर्देश दिले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (4) शिवदर्शन साठ्ये, उप सचिव मोहन काकड, नगरविकास विभागाच्या सह सचिव प्रियांका छापवाले, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका रमेश काकडे, उप अभियंता रुपाली ढगे, सहाय्यक विधि अधिकारी निलेश बडगुजर, नगर भूमापन अधिकारी, पुणे बाळासाहेब भोसले बैठकीस उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×