Breking News
Developed Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडेच पालटले

म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडेच पालटले

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

marathinews24.com

पुणे – चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडे पालटले आहे. कोथरुडकरांना मंगल कार्यासाठी अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त बँक्वेट हॉल उपलब्ध झाला असून, चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनंतर सदर सभागृह अतिशय अल्पदरात मिळणार आहे.

‘पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब’ आराखडा लवकरात लवकरात तयार करावा – बी. व्ही. आर. सुब्रमण्यम – सविस्तर बातमी  

कोथरुड हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले उपनगर म्हणून सर्वत्र परिचित आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना इथल्या सोईसुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच आग्रही असतात.

कोथरुडमधील कष्टकरी कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सातत्याने ‘अल्पदरात दिवाळी फराळ’ उपलब्ध करुन देणे, वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी ‘मानसी’ उपक्रम, विवाह इच्छुक मुलींची सन्माने पाठवणी व्हावी यासाठी ‘झाल’, त्याशिवाय गरिब कुटुंबातील गरोदर महिलांचे बाळंतपण सुरक्षितपणे व्हावे यासाठी ‘सुखदा’, असे एक ना अनेक उपक्रम सातत्याने राबवित असतात.

कोथरुडमधील प्रत्येक मुलीचे लग्न अतिशय थाटामाटात व्हावे. तसेच, त्यांनाही लग्न सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढकारातून कोथरुड देवस्थानच्या जागेतील गंगाराम सभागृहाच्या टेरेसचा लोकसहभागातून विकास करण्यात आला असून, अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असा बँक्वेट हॉल उभारण्यात आला आहे.

या मध्ये मंगल कार्यासाठी सहा हजार सक्वेअर फुटाचा प्रशस्त बँक्वेट हॉल, ५०० नागरिक एकाचवेळी जेवण करतील असा डॉयनिंग हॉल, वधू-वरांसाठी अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त स्वतंत्र कक्ष, प्रशस्त लॉबी, अशा एक ना अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, गरिब कुटुंबातील मुलींची लग्ने या सभागृहात व्हावीत, अन् सर्वांनाच मंगल कार्याचा अभिमान वाटले, यासाठी अतिशय नाममात्र दरात हे सभागृह उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती  पाटील यांनी सर्व विश्वस्त मंडळांना केली होती. त्यांनीही  पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, नाममात्र दरात सभागृह उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अभिमान वाटेल, असा हा बँक्वेट हॉल उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, या नव्या बँक्वेट हॉलचे लोकार्पण दिनांक ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि म्हातोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि कोथरुडकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायं. ०५.०० वा. होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन म्हातोबा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×