Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

अवैध गौण खनिज माफियांचे थेट केज प्रशासनालाच आव्हान

अवैध गौण खनिज माफियांचे थेट केज प्रशासनालाच आव्हान

केजमध्ये महसूलच्या आवारातून ट्रॅक्टर चोरीला; सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध सुरू

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यात अवैध गौण खनिज माफियांनी आता थेट प्रशासनालाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. केज येथील महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतलेला वाळू/मुरुमाचा ट्रॅक्टर चक्क सरकारी कार्यालयाच्या परिसरातून पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दि. २५ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास केज-कळंब रोडवर मुरूमाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. महसूल कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत हा ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) ताब्यात घेतला होता.

कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या – सविस्तर बातमी 

जप्त केलेली वाहने सुरक्षिततेसाठी सरकारी कार्यालयाच्या परिसरात उभी करण्यात आली होती. त्यानंतर चोरट्याने बनावट चावीचा वापर केला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर चोरून नेला. अज्ञात व्यक्तीने बनावट चावीचा वापर करून कार्यालयाच्या परिसरात उभा असलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुरू केली आणि तिथून पलायन केले . सकाळी जेव्हा महसूल कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच खळबळ उडाली.सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, ट्रॅक्टर चोरणारा आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. सरकारी मालमत्तेच्या आणि जप्त केलेल्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×