सीबीआय अधिकार्‍याची केली बतावणी; ३४ लाखांची फसवणूक

पर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूक

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ३४ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १६ ते २३ फेबु्रवारील कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, विविध बँकखाते धारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केटयार्डात घरफोडी; ८ लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, १६ फेबु्रवारी २०२६ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. त्याने सीबीआय अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. तक्रारदारावर ह्युमन ट्रॅफिकिंगची (मानवी तस्करी) केस असल्याचे सांगितले. पोलिस तपासात मदत करण्यास सांगत बँक बॅलन्स बाबत सायबर चोरट्यांनी विचारणा केली. तपास पूर्ण होईपर्यंत तात्पुरते पैसे भरावे लागतील असे सांगत त्यांच्याकडून ३४ लाख ८० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तक्रारदाराने अलंकार पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम हे करत आहेत.

हॉटेलला रिव्हिव्ह देण्याचा टास्क पडला १० लाखांना

हॉटेलला रिव्हिव्ह देण्याचा टास्क पुर्ण करण्याचे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेला ९ लाख ९० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १२ ते २८ जानेवारी २०२६ कालावधीत औंधमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×