पुण्यात पानविक्रीच्या आडून ग्राहकांना खाऊ घातले अमली पदार्थ

पुण्यात पानविक्रीच्या आडून ग्राहकांना खाऊ घातले अमली पदार्थ

पावडर तयार करणार्‍याला अटक

marathinews24.com

पुणे – नागरिकांनो सावधान, तुम्ही जर छंद जोपासण्यासाठी खाण्याचे पानाचे सेवन करीत असाल, तर खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पानविक्रीच्या आडून तुम्हाला अमली पदार्थांची नशा चाखावी लागेल. अशाच एका पानविक्रेत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोधून काढला आहे. त्याने मैफिल पान विक्री नावाच्या आडून अमली पदार्थांची पावडर मिश्रण ग्राहकांना खाउ घातल्याचे उघडकीस आले आहे.

पुण्यात मोबाईल चोरणार्‍याला अटक, ३५ मोबाईल जप्त – सविस्तर बातमी 

अमली पदार्थ मिश्रीत पावडर तयार करणार्‍या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पावडर, द्रव पदार्थ, ३ मोबाईल, चारचाकी वाहन, विविध मशिनरी असा असा ६ लाख ६३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी कैलास दत्तात्रय मांढरे (वय ५४) आणि त्याची पत्नी अनुराधा कैलास मांढरे (वय ५४, रा. माळसाकांत चौक, आकुर्डी, पुणे) हे अमली पदार्थ मिश्रित पावडर तयार करून विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबेगाव ग्रामपंचायत मागे, चैत्यन्य फूड गोदाम परिसरात छापा टाकला. छाप्यात दोघेही अमली पदार्थ तयार करताना रंगेहात सापडले.

अमली पदार्थ विरोधी पथक दोनने १३ मार्चला लोणी काळभोर हद्दीतील मैफिल पान हाउसवर छापा टाकला होता. त्याठिकाणी केलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडीत छापा टाकून आरोपींना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, एपीआय नितीन नाईक यांनी केली. घटनास्थळावरून पथकाने जप्त केलेलया अमली पदार्थ मिश्रित पावडरची अत्याधुनिक मशीनने तपासणी केली. त्यावेळी त्यामध्य अमली पदार्थांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×