पुण्यात आरोपीने रिक्षाच्या हूड बदलले अन पोलिसांनी हेरले

पुण्यात आरोपीने रिक्षाच्या हूड बदलले अन पोलिसांनी हेरले

सीसीटीव्हीद्वारे वाहनांचा शोध, ६ आरोपींना बेड्या; मांगडेवाडीतील खूनाची उकल

marathinews24.com

पुणे – गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी मात्र पोलीस तपासात कधीही मागे राहत नाहीत. अशाच एका महिलेच्या खुनाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित वाहन चालकांना निवडल्यानंतर त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी एका रिक्षा चालकाने टपावर लावलेले हूड (कापड) बदलल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याच्याकडे चालकाकडे कसून चौकशीत महिलेच्या खुनाची उकल झाली आहे. खूनाची घटना १० फेबु्रवारीला कात्रजमधील मांगडेवाडीच्या डोंगरात घडली होती.

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई – सविस्तर बातमी 

रिक्षाचालक केशव कमलेश चौधरी (वय २०, रा. भारतनगर, कात्रज) सोनू लक्ष्मण पवार (वय १८) अब्दुल मोहंमद शेख (वय २३ ) महादेव अर्जुन व्होरडे (वय ४०) साई अमित पुजारी (वय १९) सोहेल हनिफ खान (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यात आता अपहरण तसेच खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. कात्रजमधील ४० वर्षीय महिलेचा याघटनेत खून झाला आहे. साई पुजारी, सोनू पवार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

कात्रजमधील मांगडेवाडी परिसरात दगडांच्या खाणीत महिलेचा १० फेबु्रवारीला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेची दोन पथकाने ३ किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले. ९७ फुटेज संकलित करून संशयित ३५ वाहन चालकांकडे चौकशी केली. त्यावेळी रिक्षाचालक केशव चौधरी याने रिक्षाच्या हुड (टप)मध्ये बदल केल्याचे दिसून आले. त्यानंतर संशयातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने साथीदाराच्या मदतीने महिलेला दरीत ढकलून खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, निखील पिंगळे, एसीपी शैलेश संखे, वरिष्ठ निरीक्षक अश्विनी जगताप, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक संजय जाधव, विजय पवार, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, साधना ताम्हाणे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, योगेश मांढरे, संदीप शिर्वेâ यांनी केली.

शॉटकटसचा बहाणा; डोंगरात नेऊन केला खून

शेअरिंग रिक्षा असल्याचे समजून महिलेने आरोपी चौधरीची रिक्षा थांबवली. त्यावेळी रिक्षात बसलेले आरोपीचे मित्र अब्दुल शेख, सोनू पवार यांनी मद्यपान केले होते. महिलेने त्यांना रिक्षातून कात्रजमधील हॉटेल परिसरात सोडण्यास सांगितले. त्यावेळी शॉटकट्सचा बहाणा करीत आरोपींनी तिला मांगडेवाडीतील डोंगरात नेले. त्यावेळी महिलेने त्यांच्याशी वादविवाद केल्यानंतर नशेतील आरोपींनी महिलेला मारहाण करून थेट खाणीत ढकलून देत तिचा खून केला. १० फेबु्रवारीला नागरिकांना महिलेचा मृतदेह दिसून आला होत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×