Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वारी मार्गावर माहितीपर प्रदर्शन, ध्वनीप्रसारण आणि लोककलांच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये जनजागृती

marathinews24.com

पुणे – केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने आषाढी वारी सोहळ्यानिमित्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत ‘चरण सेवा’ उपक्रम – सविस्तर बातमी 

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, सामाजिक संदेश तसेच जनजागृतीपर माहिती वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने हा विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे. वारी मार्गावर हा चित्ररथ विविध ठिकाणी जनजागृतीचे कार्य करणार असून, माहितीपर प्रदर्शन, ध्वनी प्रसारण आणि लोककलांच्या माध्यमांतून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×