Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

अकराव्या राष्ट्रीय कला उत्सवाचे उद्घाटन

२० डिसेंबर रोजी यशदा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार

marathinews24.com

पुणे – भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित अकराव्या राष्ट्रीय कला उत्सवाचा उदघाटन सोहळा शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी यशदा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद संकलानी, एससीईआरटीचे संचालक राहूल रेखावार, एनसीईआरटीच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योत्स्ना तिवारी व शिक्षण विभागातील मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. एनसीईआरटी, नवी दिल्लीद्वारे या उत्सवाचे २०१५ पासून दरवर्षी आयोजन केले जाते.

‘दिव्यांगासाठीच्या ‘मेटको’चा विक्री प्रस्ताव थांबवा: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी – सविस्तर बातमी

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असलेली एक प्रमुख क्षमता म्हणून कलेकडे पाहिले जाते. कला हे ज्ञानप्राप्तीचे प्रभावी माध्यम असल्याचे या धोरणात नमूद असून, याच संकल्पनेचा सर्वांगीण समावेश राष्ट्रीय कला उत्सवामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अपेक्षित असलेला प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

यंदाचा अकरावा राष्ट्रीय कला उत्सव २०२५ हा विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सर्जनशील, अभिव्यक्तिपूर्ण आणि आनंददायी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे. या उत्सवात देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसह केंद्रीय विद्यालये (KVS), नवोदय विद्यालये (NVS) आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथील विद्यार्थी, शिक्षक तसेच प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये देशभरातून ४०५ मुले आणि ५१३ मुली असे एकूण ९१८ विद्यार्थी, १०८ शिक्षक आणि ३६ परीक्षक यांचा सहभाग असणार आहे. या कला उत्सवामध्ये गायन, वादन, नृत्य, नाटक, दृश्यकला, पारंपारिक कथाकथन इत्यादी १२ कला प्रकारांचा समावेश असून त्यांचे सादरीकरण होणार आहे.

यंदाचा हा कला उत्सव महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने तसेच श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या सहकार्याने दि. २० ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे संपन्न होणार आहे.
राष्ट्रीय कला उत्सव २०२५ चे उद्घाटन शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, २२ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धा यादरम्यान पार पडतील. २३ डिसेंबर २०२५ रोजी समारोप व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा राष्ट्रीय कला महोत्सव शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. यामुळे देशभरातील विद्यार्थी, शिक्षक यांना महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन होईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×