Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पिस्टलासह काडतुस बाळगणारा सराईत जेरबंद

पिस्टलासह काडतुस बाळगणारा सराईत जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई

marathinews24.com

पुणे – गावठी पिस्टलासह दोन जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने दत्तवाडीत पकडले आहे. प्रशांत भाऊसाहेब घाडगे ( वय २३, रा. गोरक्षक स्मृती बिल्डींग, प्लॅट नंबर १०७, खोपडेनगर, कात्रज) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

पुण्यात गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २६ सराईत तडीपार – सविस्तर बातमी 

गणपती उत्सवाच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवालदार अमित बोडरे, महेंद्र तुपसौंदर, मोहम्मद शेख, पोलीस शिपाई चेतन शिरोळकर, तुषार किंद्रे हे फरार आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते. पर्वती पोलीस ठाण्याच्या हददीत पेट्रोलिंग करताना पोलीस अमंलदार बोडरे व शिरोळकर यांना सराईत प्रशांत घाडगे हा दत्तवाडीत असून त्याच्यातडे पिस्टल व जिवंत काडतुसे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दत्तवाडीतील महागीर बुवा चौकात सापळा रचून घाडगेला ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

पुढील कारवाईसाठी सराईत घाडगे याला पर्वती पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्याने पिस्टल का बाळगले याची चौकशी पर्वती पोलिसांकडून केली जाणार आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवालदार अमित बोडरे, महेंद्र तुपसौंदर, मोहम्मद शेख, पोलीस शिपाई चेतन शिरोळकर, तुषार किंद्रे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×