वानवडी पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे– तडीपार आदेशाचे उल्लंघन करीत शहरात प्रवेश करून शस्त्रासह फिरणाऱ्या एका आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. माधव मधुकर घुमरे ( वय ४२.रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी, जबर दुखापत आणि एनडीपीएससारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सामूहिक बलात्कारातील तिसऱ्या आरोपीला वालचंद नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या – सविस्तर बातमी
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने वानवडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत होते. रात्रगस्तीवेळी रामटेकडीतील गुन्ह्यात फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण व बालाजी वाघमारे यांना संयुक्तीकरित्या रेकॉर्डवरील तडीपार गुंड माधव घुमरेची माहिती मिळाली. तो रामटेकडी अंधशाळेसमोर, हडपसर एकटाच संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्यासाठी आला होता. त्यानुसार पथकाने धाव घेऊन माधव घुमरे हा संशयितरित्या थांबलेला असताना पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांच्यासह इतर अंमलदारांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक कोयता मिळुन आला. तडीपार असतानाही तो विनापरवाना पुणे शहरात आल्याचे उघडकीस आले.
त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ व ३७ (१) (३) सह १३५ आणि आर्म ऍक्ट कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी, जबर दुखापत आणि एनडीपीएससारखे गंभीर गुन्हे वानवडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार महेश गाढवे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, पोलीस निरिक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस उपनिरिक्षक हनुमंत भोसले, पोलीस अमंलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अतुल गायकवाड, यतीन भोसले, विष्णु सुतार,अभिजीत चव्हाण, बालाजी वाघमारे, सोमनाथ कांबळे यांनी केली आहे.