Breking News
Mahatma Jyotirao Phule : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहनKharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रम

विमानाने पुण्यात येउन जबरी चोरी करणार्‍या सराईतांना अटक

खडकी पोलिसांची कामगिरी, एटीएमकार्ड बदल करीत होते चोऱ्या

marathinews24.com

पुणे – विमानाने पुण्यात येउन जबरी चोर्‍या करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७० हजारांचा ऐवज जप्त केला असून, आणखी मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे. एटीएम सेंटरमध्ये नागरिकांना मदतीचा बहाणा करणे, एटीएम कार्ड हिसकावून घेणे, नागरिकाला रोकड जास्त असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवणे, मदत करण्याचा बहाणा करीत टोळक्याकडून चोर्‍या केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. सावेज सलीम अली (वय ३० रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) नियाज इजाज मोहम्मद (वय २९, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

‘डिजिटल’ अटकेची दाखवली भीती, पुण्यात ज्येष्ठाची ६ कोटींची केली फसवणूक – सविस्तर बातमी

एटीएम मशीनमधून पैसे काढून देतो अशी बतावणी करीत चोरट्यांनी ९ मे रोजी संजय कदम (वय ६३) यांची खडकीत फसवणूक केली होती. कदम हे सुरक्षारक्षक असून, १२ हजार रूपये पगाराची नोकरी करतात. चोरट्यांनी त्यांना मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून देत आयुष्याभराची १ लाख ५ हजारांची कमाई काढून घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकाला दिले होते.

त्यानुसार तपास पथकाचे प्रमुख दिग्विजय चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटिव्ही फुटेज व टेक्नीकल माहिती प्राप्त करण्यात आली. पोलीस अमलदार प्रताप केदारी उर्फ आबा यांना आरोपींची माहिती मिळाली. आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेश येथील असुन देशातील विविध शहरात फिरत लुटमार करीत असल्याचे समजले.

आरोपी विमानाने पुण्यात येउन ठिकठिकाणच्या एटीएम सेंटरवरील जेष्ठ नागरिकांना सावज करीत लुटमार करीत असल्याचेही स्पष्ट झाले. नानापेठ परिसरातील लॉजमध्ये राहत असल्याची माहिती मिळताच, पोलीस अमलदार रुषीकेश दिघे यांनी तांत्रिक माहितीद्वारे आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. सराईत पुण्यात येताच उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, अनिकेत भोसले, सुधाकर राठोड, सुधाकर तागड, गालीब मुल्ला, दिनेश भोई यांनी लॉजमध्ये छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा अपर आयुक्त मनोजकुमार पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव,एसीपी विठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चैगले, प्रशांत माळी, संदेश निकाळजे, आश्विनी कांबळे, भाऊसाहेब शेवरे, सुधाकर राठोड, अनिकेत भोसले, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, प्रताप केदारी, गालीब मुल्ला, प्रविण गव्हाणे, शिवराज खेड यांनी केली.

विमान प्रवास ते पुण्यातील लॉजवरील मुक्काम

दोन्ही आरोपी सराईत असून, देशभरातील विविध शहरातंर्गत त्यांनी एटीएम सेंटरजवळ थांबून नागरिकांची लुट केली आहे. उत्तर प्रदेशातून विमानाने पुण्यात आल्यानंतर ते नाना पेठेतील लॉजमध्ये राहत होते. त्यानंतर कमी गर्दीच्या ठिकाणी एटीएम सेंटरमध्ये थांबवून जेष्ठ नागरिक सावज हेरत होते. त्यांना मदतीचा बहाणा करीत एटीएम कार्ड बदलून देणे, रक्कम काढत असताना पाठीमागे थांबून कोड पाहणे, कार्ड हिसकावून घेत आरोपी लुटमार करीत होते.

कोट-विमानाने पुण्यात येउन जबरी चोर्‍या करणार्‍या दोघा आंतरराज्यीय सराईतांना अटक केली आहे. एटीएम सेंटरमध्ये जेष्ठ नागरिकांना मदतीचा बहाणा करीत ते लुटमार करीत होते. त्यांच्याकडून ७० हजारांवर ऐवज जप्त केला असून, आणखी ऐवज मिळण्याची शक्यता आहे. – दिग्विजय चौगले, पोलीस उपनिरीक्षक, खडकी पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×