Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पुण्यात पब, रेस्टाॅरंट चालकांसाठी सूचना

गोव्यातील नाइट क्लब’ दुर्घटनेनंतर खबरदारी

marathinews24.com

पुणे – गोव्यातील नाइट क्लबमध्ये झालेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अग्निशमन दलाने शहरातील पब, रेस्टाॅरंट, उपाहारगृह चालकांना सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन उपाययोजनांची तपासणी करण्याचे आदेश अग्निशमन दलाकडून देण्यात आले आहेत.

पुण्यातील नवले ब्रिजजवळ पुन्हा अपघात – सविस्तर बातमी

‘गोव्यातील नाइट क्लबमधील दुर्घटना नववर्षाच्या पार्श्वभूमीवर घडली. नाताळपासून पुण्यातही विविध पब, रेस्टाॅरंट, उपाहारगृहांमध्ये गर्दी होण्यास सुरुवात होते. नववर्षापर्यंत ती आणखी वाढते. गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पब, रेस्टाॅरंट, बार, तसेच उपाहारगृहचालकांसाठी आपत्कालीन उपाययोजना, तसेच सुरक्षेसंदर्भात सूचना दलातर्फे देण्यात येणार आहेत. येत्या दोन दिवसांत विविध सूचनांचे परिपत्रक संबंधितांना पाठविण्यात येईल,’ अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.

‘शहरातील अनेक पब, रेस्टाॅरंट, बारमध्ये प्रवेश करण्यासाठी, तसेच बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गांची पाहणी करणे गरजेचे आहे. आग किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास ग्राहकांना त्वरित बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पब, रेस्टाॅरंट, बारमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहे का नाही, याची पाहणी करणे गरजेचे आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्वरित केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत पब, रेस्टाॅरंट, बारचालकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाेहोचेपर्यंत मदतकार्य सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षित करायला हवे. याबाबत त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही अग्निशमन दलाकडून दिले जाईल. आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सराव करणे गरजेचे आहे. पब, बारमधील कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणेही गरजेचे आहे.’, असे पोटफोडे यांनी नमूद केले.

गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पब, रेस्टाॅरंट चालकांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांची पाहणी करणे गरजेचे आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्वरित बाहेर पडण्यासाठी ग्राहकांना मार्ग उपलब्ध करून द्यायला हवा. – सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×