Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

आंतरराज्यातील दरोडेखोर टोळीला अटक, २० गुन्ह्यांची उकल

स्थानिक गुन्हे शाखेसह ओतूर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीतील ६ जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह ओतूर पोलिसांना यश आले आहे. टोळीकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूसांसह तब्बल १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत विविध स्वरूपाचे २० गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. सोनूसिंग कापूरसिंग टाक ( वय ३० रा हडपसर ) जिलूसिंग शेरसिंग दुधाना (वय ४० रा. खोपोली, शिळफाटा. जि. रायगड ) करणसिंग गगनसिंग टाक ( वय २७ रा. परभणी) पंकजसिंग काळुसिंग शिकलगार ऊर्फ दुधानी (वय ४० रा. अंबरनाथ) पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक (वय १८ रा. परभणी) मंगलसिंग मायासिंग दुधानी (वय ५८ रा. झरी, जि. परभणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोबाइल हिसकावणार्‍याला बेड्या, ३ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी

अहिल्यानगरमधील लोणी प्रवरा याठिकाणाहून चोरीला गेलेली जीप १२ जुलैला ओतूर ठाण्याच्या हद्दीत मिळून आली होती. दरम्यान, वाहन मालकाचे नातेवाईक विघ्नेश घोलप हे शोध घेत असताना संबंधित संशयितांना त्यांनी विचारणा केली. त्यावेळी घोलप यांनी ‘चोर-चोर ’ अशी आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. त्यानंतर गावकर्‍यांनी दोन आरोपींना पकडले, तर इतर चार आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले. याप्रकरणी पोलीस पथकांनी पळून गेलेल्या आरोपींचा पाठलाग केला, शोध कार्यात सातत्य ठेवून आलमे गावचे डोंगर दरी परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, एपीआय महादेव शेलार, उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी आरोपींचा शोध सुरू केला.

आरोपींच्या शोधार्थ डोंगर माथ्यालगत सलग ६ तास आमले गावचे परिसरातील दरी परिसरात स्थानिक नागरीकांचे मदतीने आरोपींचा शोध सुरू ठेवला. आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी परिसरातील नागरिक, पोलीस पाटील यांच्या मदतीने पळून गेलेल्या चारही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी असे २० गुन्हे केल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक शुभमकुमार, उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, एपीआय ज्ञानेश्वर बाजगिरे, आनंदा भवारी, बाळशिराम भवारी, धनंजय पालवे, सुरेश गेंगजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराने, देविदास खेडकर, दिपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, संगीता मधे, रेश्मा फापाळे, मनोज राठोड, रोहित बोंबले, ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, विशाल गोडसे, योगेश उकिर्डे, काळे यांनी केली.

सराईत टोळींनी केलेले गुन्हे

आरोपींवर यापुर्वी महाराष्ट्रासह तेलंगणा व इतर राज्यांमध्ये ५० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, २० गुन्ह्यांमध्ये २ दरोडे, ०१ दरोडा प्रयत्न, ०२ जबरी चोरी, १३ घरफोडी व ०२ वाहन चोरीचे गुन्हे समावेश आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×