शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – नागरिकांचे मोबाइल हिसकावून नेणार्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून दुचाकीसह २ लाख ३७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आकाश सुरेश वाघिरे (वय २१ रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तरूणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार हे १० जुलैला सकाळी संचेती चौकात थांबून कॅब बुक करीत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्याकडील १ लाख ३७ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला.
पुण्यात नातेवाईकांकडून जावयांची धुलाई – सविस्तर बातमी
जबददस्तीने मोबाइल हिसकावून नेण्याचा गुन्हा दाखल शिवाजीनगर ठाण्यात करण्यात आला होता. संबंधित आरोपी दुचाकीसह वेताळबाबा चौकात येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार महावीर वलटे, दीपक रोमाडे यांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून आकाश वाघिरे याला अटक केली. ही कामगिरी उपायुक्त कृषीकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने, वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, एपीआय संतोष पाटील, भाउ चव्हाण, राजकिरण पवार, इसाक पठाण, सचिन जाधव, श्रीकृष्ण सांगवे, श्रीकांत मखरे यांनी केली.
























