Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार देखील देतो

शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार देखील देतो

ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते फतेचंद रांका यांचे मत : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे १० वा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

marathinews24.com

पुणे – भारत हा ज्ञानाचा खंड आहे. नालंदा विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. आजही भारतातील युवक अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात विविध क्षेत्रांत आपले वर्चस्व निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांना दिले जाणारे संस्कार हा शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आयुष्यात घडण्यासाठी आई-वडील आणि गुरुजनांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात, असे मत ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व रांका ज्वेलर्स प्रा. लि.चे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केले.

दावे-हरकती कालावधीत पुणे जिल्ह्यात २१ हजार ५५५ अर्ज प्राप्त – सविस्तर बातमी 

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे १०व्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नऱ्हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल-१ येथे करण्यात आले. यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. रांका ज्वेलर्स प्रा. लि.चे अध्यक्ष फत्तेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते.

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे डॉ. संजीव सोनवणे यांना आदर्श कुलगुरू पुरस्कार, मराठवाडा मित्र मंडळ, डेक्कन जिमखाना, पुणेचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना आदर्श संस्थापक पुरस्कार, ग. तु. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, नंदुरबारचे डॉ. महेंद्र रघुवंशी यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पराग सदगीर यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. शिक्षक दिन आणि संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

विश्वेश कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपण कोण आहोत आणि आपली क्षमता काय आहे, याचे विश्लेषण केले पाहिजे. दुसऱ्यांकडे पाहून त्यांची नक्कल करण्याऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची कुवत ओळखली पाहिजे. कंपन्यांना केवळ पदवीधर नव्हे, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले मनुष्यबळ हवे आहे. त्यामुळे अनुभवाधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. देशात कामासाठी मनुष्यबळ मिळत नसल्याची परिस्थिती असताना बेरोजगारी हा विषय केवळ सामाजिक किंवा राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिला आहे. शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज असून, केवळ टक्केवारीला महत्त्व न देता विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक मानसिकता विकसित केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, विकसित भारताच्या निर्मितीसाठी सक्षम मानवी भांडवल विकसित करण्याची गरज आहे. हे मानवी भांडवल देशाच्या विकासात योगदान देईल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. पराग सदगीर म्हणाले, शिक्षकाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम होतील.

ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, आई-वडिलांनंतर आपल्या जीवनात सर्वांत महत्त्वाची भूमिका शिक्षकांची असते. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद शिक्षक देतात. शिक्षक केवळ अक्षरांची ओळख करून देत नाहीत, तर योग्य-अयोग्याची जाणीव करून देतात आणि स्वप्नांसाठी संघर्ष करण्याची शिकवण देतात. शिक्षकांमुळे समाज घडत आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे शिक्षक कमी दिसतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी प्रयत्न करणारे अधिक दिसतात, ही आजची सत्य परिस्थिती आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य भाऊसाहेब जाधव आणि डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×