जगभरात लाखो रुपयांच्या दरात विकला जाणारा मियाझाकी आंबा पिकवलाय पुणेकर शेतकऱ्याने
marathinews24.com
पुणे – उन्हाळ्यातील फळांचा राजा म्हटलं की,आपल्या नजरेसमोर लगेच आंबा येतो आणि त्यामध्ये हापूस, पायरी, लालबाग, केशरी या आंब्याचा आस्वाद केव्हा घेण्यास येईल. आपण याची वाट पाहत असतोच, तर आता आंब्याचा हंगाम सुरू झाला असून अनेक ठिकाणी आंबे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. आपल्या येथील हापूस आंबा हा परदेशात राहणार्या नागरिकांना देखील येथुन पार्सलद्वारे मिळु लागला आहे.
आपल्या येथील आंबे परदेशात जाऊ लागले आहेत. पण याच परदेशातील जवळपास ९०आणि आपल्या येथील ३० अशी एकूण १२० आंब्याच्या झाडांची लागवड केवळ २० गुंठयात पुण्यातील वरवंड भागातील फारूक इनामदार या शेतकर्यांनी केली आहे.तर यामध्ये विशेष बाब म्हणजे जपान येथील मियाझाकी या आंब्याची लागवड करण्यात आली असून तो जपान येथे 2 लाख ७० हजार रुपये किलोमध्ये मिळतो.तोच आंबा आपल्या देशात दीड लाख रुपये किलोमध्ये आहे.
याबाबत फारूक इनामदार म्हणाले की,आमची वरवंड भागात शेती असून आम्ही सर्व प्रकरची पिक घेत आहोत,आमच्या शेतामध्ये सुरुवातीपासून काही आंब्याची झाड आहेत.पण मी काही वर्षांपूर्वी हज यात्रेला गेलो होतो.त्यावेळी त्या ठिकाणी जगभरातील सर्व फळ आलेली होती.ती सर्व फळ पाहिल्यावर त्या मध्ये सर्वाधिक आंब्याचे विविध प्रकार होते.त्या सर्व आंब्याची माहीती घेतली आणि आपल्या इथ आल्यावर अनेक देशातून झाड मागविण्यात आल्यानंतर, २० गुंठे जागेत तब्बल १२० आंब्याची झाडांची लागवड केली.यामध्ये आपल्या देशातील ३० आबांच्या झाडांसह परदेशातील ९० झाडांचा त्यामध्ये समावेश आहे. ही सर्व आंब्याची झाड लावून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असून चांगली फळ आली आहेत.
तसेच त्या फळांबाबत सांगायच झाल्यास,रेड आफ्रिकन,रेड तैवान, अरुनीका,बनाना मँगो,ऑस्ट्रेलिया मधील ए 2 आर 2, बांगलादेश येथील कटोमोनी, बांगलादेश चा शाहजान या आंब्याची लागवड करण्यात आली आहे.ही सर्व आंबे काही हजार रुपये किलोमध्ये मिळणार,पण यामध्ये मियाझाकी हा जपान येथील असून त्या ठिकाणी 2 लाख ७० हजार रुपये किलोमध्ये मिळतो.पण तो आंबा आपल्या देशात दीड लाख रुपये किलोपर्यंत मिळतो.साधारणपणे किलोमध्ये ४ ते ६ आंबे बसू शकतात.सरासरी ३०० ग्राम एका आंब्याच् वजन असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले,कोयतूर या झाडाला ८ ते १० किलो पर्यंतच आंबे येतात आणि त्या झाडांच्या एका आंब्याची दीड ते पाच हजार रुपये किंमत आहे. तसेच आता येत्या काळात ही सर्व आंबे विक्रीस जाणार असून आम्ही अनेक देशातील आंबे लागवड करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाने नवनवीन पीक घेऊन आपल उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष दिले पाहीजे,असे आवाहन देखील त्यांनी शेतकरी वर्गाला त्यांनी केले.