जयंत पाटील हा बिनडोक माणूस; गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने राजकीय वादंग

जयंत पाटील हा बिनडोक माणूस; गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने राजकीय वादंग

जत मधील कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात बदनामीचा आरोप

marathinews24.com

सांगली : (रेवण कोळेकर)  भाजप आमदार गाेपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. एका कंत्राटदाराच्या आत्महत्येच्या प्रकरणात माझी बदनामी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत भोवली; १३ जणांविरुद्ध गुन्हा, आयुष कोमकर खून प्रकरण – सविस्तर बातमी 

जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे, दर आठ दिवसाला हा माणूस आपण किती बिनडोक आहे हे सिद्ध करतोय, त्यांचे काम फक्त गोपीचंद पडळकर ला बदनाम करणे एवढेच आहे. तो एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न करत आहे, माझी जाणीवपूर्वक बदनामी करत आहे. असा गंभीर आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पडळकर म्हणाले, जयंत पाटलांना जत मधून एका माजी आमदाराचा फोन गेला, अभियंता वडार यांची आत्महत्या झाली आहे… आपण आता काय करायचे..? असा प्रश्न जयंत पाटील यांना केल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की तो माझ्या ईश्वरपूरचा (इस्लामपूर) आहे. मी इथून फिल्डिंग लावतो. मात्र त्यांना कळायला पाहिजे की, एका आमदाराचे ज्युनियर इंजिनियर कडे काय काम असते. आमदार आपल्या फंडातील कामाबद्दल जिल्हा नियोजन कडे पत्र देतात, जिल्हा नियोजन च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समितीकडे हे पत्र जाते, त्यानंतर ज्युनिअर इंजिनिअर अंदाजपत्रक तयार करत असतात. हे जयंत पाटील यांना कळायला हवे. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो का? त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही असे पडळकर म्हणाले.

त्यानंतर पडळकर म्हणाले जत मध्ये दहीहंडीचा कार्यक्रम घेतल्यानंतर जयंत पाटलांनी आपण कोणत्या व्यापाऱ्यांकडून खंडित घेतली आहे का, ही माहिती घेण्यासाठी जयंत पाटलांनी जत मध्ये माणसे पाठवली होती. कार्यक्रम घेण्याची धमक आमच्यामध्ये आहे, पण मी काय असाच आलोय का? असे अनेकजण अंगावर घेऊन आलोय. या प्रस्थापितांच्या सत्ता कारणांमध्ये दोन-दोन महिने मी जेल मध्ये जाऊन आलोय असे म्हणाले असेही पडळकर म्हणाले

लवंगा येथे जमिनी घेतल्या पण कारखानाच उभारला नाही

आमदार पडळकर म्हणाले, माजी आमदार विक्रम सावंत यांनी कारखाना उभारण्यासाठी अतिशय कमी दरामध्ये जमिनी घेतल्या पण कारखाना उभारलाच नाही. अशा जमिनी कायद्यानुसार शेतकऱ्यांना परत मिळतात त्या जमिनी मी शेतकऱ्यांना परत मिळवून देईल, व पवनचक्कीच्या जमिनीही शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच उमदी येथे बाजार समितीची जमिन खरेदी केल्याचा गैरव्यवहार उघडकीस आणणार आहे. असेही आमदार पडळकर म्हणाले.

पडळकर यांच्या वक्तव्याने राज्यभरात राजकीय वादंग

आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यामुळे राज्यभरातून पडळकरंवर अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यावर आमदार गोपीचंद पडळकर ययांच्यावर देखील सडकून टीका होताना दिसत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×