Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

पालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपास

पालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपास

समर्थ, मांजरी, हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – पालाखी सोहळ्यात कडक बंदोबस्त तैनात असताना भाविकांकडील साडेपाच लाख रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. पुणे-सोलापूर रस्ता, तसेच भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात दागिने चोरीच्या घटना घडल्या. या प्रकरणी समर्थ, मांजरी, तसेच हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (९ जुलै) शहरात मुक्कामी आला. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र चाेरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी (१० जुलै) सकाळी दहाच्या सुमारास घडली. याबाबत एका ५१ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रादार महिला या गणेश पेठेत राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या भवानी पेठेतील श्री पालखी विठाेबा मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या रथाचे दर्शन घेत होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करत आहेत.

शहरातून पालखीने श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवल्यानंतर प्रस्थान मार्गावर भाविकांकडील दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या. पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी येथे शनिवारी (११ जुलै) दुपारी अ़डीचच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि साेनसाखळी असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस कर्मचारी सोनवणे तपास करत आहेत.

हडपसरमधील गाडीतळ चौकात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. गर्दीत एका महिलेसह दहा भाविकांच्या गळ्यातील तीन लाख ५६ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील तपास करत आहेत.

पुण्यात ८९ संशयित ताब्यात

पालखी सोहळ्यात पालखी सोहळ्यात भाविक, तसेच वारकऱ्यांकडील दागिने, रोकड चोरणाऱ्या ८९ संशयितांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. यामध्ये ६७ महिलांचा समावेश आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस असल्याच्या बतावणीने तरुणाला लुटले

पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्याने तरुणाला लुटल्याची घटना मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावर घडली.
याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहायला आहे. शनिवारी (११ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास तरुण आणि त्याचा मित्र बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावर थांबले होते. तेथील एका खासगी प्रवासी वाहतूकदाराच्या थांब्याजवळ चोरट्याने तरुणाला अडवले. पोलीस असल्याची बतावणी करुन त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणाला धमकावून त्याच्याकडील मोबाइल ताब्यात घेतले. ऑनलाइन पेमेंट सुविधेद्वारे बँक खात्यातील एक लाख ३२ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केली. त्यानंतर तरुणाचा मोबाइल संच घेऊन चोरटा पसार झाला. पोलीस कर्मचारी भोरडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×