कात्रज प्राणीसंग्रहालयात घडली घटना
marathinews24.com
पुणे – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पर्यटक महिलेच्या पिशवीतून दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसस्थानकात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले -सविस्तर बातमी
तक्रारदार महिला मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील कावलगावातील रहिवासी आहेत. उन्हाळी सुटीनिमित्त त्या नातेवाईकांकडे आल्या आहे. महिला मुलांना घेऊन कात्रज येथील प्राणी संग्रहालयात आल्या होत्या. त्या वेळी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी होती. चोरट्यांनी महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधली. पिशवीची चेन उघडून एक लाख ४९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी प्राणीसंग्रहालयाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस कर्मचारी निर्मळे तपास करत आहेत.
पादचाऱ्याची सोनसाखळी हिसकावली
पादचाऱ्याची ९० हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना खराडी भागात घडली. याबाबत एकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अहे. तक्रारदार रविवारी रात्री दहाच्या सुमारास मुंढवा-खराडी बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. हाॅटेल अतिथीजवळ असलेल्या फळ विक्रेत्याच्या दुकानाजवळ ते फळे खरेदी करत होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यंनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करत आहेत.