Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

कोंढव्यात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

Bibwewadi Firing Case : अल्पवयीनाकडून झालेल्या गोळीबारात तरुण जखमी

वादातून टोळक्याचा हल्ला

marathinews24.com

पुणे – जुन्या वादातून कोंढव्यातील लक्ष्मीनगर परिसरात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर गोळी झाडल्याची घटना ६ सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजता घडली. गोळी डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने तरूण गंभीर जखमी झाला. सौरभ अनिल त्रिबंके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दादु भालेराव, जाम्बा यांच्यासह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलमांसह आर्म्स अ‍ॅक्ट, क्रिमिनल अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणच्या रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पंधरकर आणि अल्पवयीन मुलाचा वर्षापुर्वी वाद झाला होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, सौरभ हा रविवारी (दि. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास मित्र बंटी पवार याच्यासोबत घराबाहेर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी त्यांचा मित्र सागर पंधरकर याच्याशी झालेल्या वादाच्या कारणावरून आरोपी तेथे आले. आरोपींनी एकत्र येत आरडाओरड करून परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी दादू भालेराव याने जवळील पिस्तुलातून त्रिबंके यांच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेली. घटनेनंतर आरोपी पसार झाले. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुरावे तपासले जात आहेत. यातील काही आरोपींना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×