Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

कोथरुडमध्ये महिलेचे दागिने हिसकावले

कोथरुडमध्ये महिलेचे दागिने हिसकावले

पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने चोरट्याने लांबविली २ लाख ४७ हजारांची सोनसाखळी

marathinews24.com

पुणे – पाणीपुरी विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना कोथरूड परिसरात घडली. याबाबत पाणीपुरी विक्रेत्या महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील धनकवडी, आंबेगाव, लोणीकंद भागात घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय महिला कोथरूड भागातील गुरुगणेशनगर परिसरात राहायला आहेत. त्या डुक्कर खिंड परिसरातील दोडके प्लाझा इमारतीसमोरील मोकळ्या जागेत पाणीपुरी विक्रीची गाडी लावतात. सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास चोरटा पाणीपुरी खाण्याचा बहाण्याने गाडीजवळ आला. त्याने ज्येष्ठ महिलेला पाणीपुरी देण्यास सांगितले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दोन लाख ४७ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा तेथून पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेचे मंगळसूत्र चोरीला

पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४५ वर्षीय महिला ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहायला आहेत. त्या मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे स्टेशन ते कात्रज या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. गर्दीत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. पोलीस उपनिरीक्षक शिरसट तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×