Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

पुण्यातील धनकवडी, आंबेगाव, लोणीकंद भागात घरफोडी

पुण्यातील धनकवडी, आंबेगाव, लोणीकंद भागात घरफोडी

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला. चोरट्यांनी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक, अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद भागात सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. धनकवडीतील आंबेगाव पठार भागात असलेल्या बेकरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील तीन लाख रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

धनकवडीतील आंबेगाव पठार भागात असलेल्या बेकरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील तीन लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत बेकरी मालकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार परिसरातील चिंतामणी शाळेजवळ ब्राऊन बेकर्स ही बेकरी आहे. चोरट्यांनी बेकरीचे कुलूप तोडून गल्ल्यातील तीन लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रुकमधील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा चार लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आंबेगावमधील भैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या श्रीयांश रेसीडन्सी सोसायटीत राहायला आहेत. सोमवारी (२४ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास सदनिका बंद करुन त्या कामानिमित्त बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दुपारी साडेचारच्या सुमारास महिला घरी परतली. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक नायकवाडी तपास करत आहेत.

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एक लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लोणीकंदमधील कोलवडी रस्त्यावर असलेल्या शितोळे वस्तीत राहायला आहेत. त्यांचे बैठे घर आहे. चोरट्यांनी घराशेजारी असलेल्या खोलीचे कुलूप तोडून जुन्या पत्र्याच्या पेटीत ठेवलेले दागिने, रोकड लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक कागणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×