Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

२७ वर्षीय सैफ खानचा उपचारांपूर्वीच मृत्यू; टेम्पो आणि टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा-घोरपडी रस्त्यावर घडली. या प्रकरणी टँकर चालक, तसेच एका टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पो चालकाने दरवाजा उघडा ठेवला होता. त्या वेळी दुचाकीस्वार तरुण दरवाज्यावर आदळल्याने रस्त्यात पडला. पाठीमागून येणाऱ्या टँकरच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला. सैफ खान (वय २७) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सैफ याची आई मुन्सरा शफी खान (वय ५०, रा. पठाण गल्ली, कमलनगर, जि. बिदर, कर्नाटक) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस असल्याचे भासवून ऑनलाइन ३७ हजार ९०० रुपये घेतले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सैफ हा १६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंढव्यातून घोरपडीकडे निघाला होता. त्या वेळी मुंढव्यातील सीएनजी पंपाजवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो थांबला होता. टेम्पो चालकाने टेम्पोचा दरवाजा उघडा ठेवला होता. दुचाकीस्वार सैफ हा दरवाज्यावर आदळला. त्याचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यात पडला. पाठीमागून येणाऱ्या टँकरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या सैफ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी टेम्पो चालक, तसेट टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×