Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पोलिस असल्याचे भासवून ऑनलाइन ३७ हजार ९०० रुपये घेतले

पोलिस असल्याचे भासवून ऑनलाइन ३७ हजार ९०० रुपये घेतले

सोलापूर रस्त्यावरील नलिनी सोसायटीसमोर पहाटेच्या सुमारास घडला प्रकार

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याचे खोटे सांगून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तरुणाची लुटल्याचा प्रकार वानवडी परिसरात घडला. तक्रारदाराच्या दोन मित्रांच्या मोबाइलमधील फोन-पे खात्याचा वापर करून ३७ हजार ९०० रुपये ऑनलाइन व्यवहार करण्यात आले. त्यानंतर मोबाइलचा पासवर्ड आणि फोन-पेचा पिन क्रमांक घेतला. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २३ ऑगस्टला पहाटे तीन वाजून ४० मिनिटांच्या सुमारास नलीनी सोसायटीसमोर, सोलापूर रस्त्यावर घडला.

श्वान अंगावर सोडून तरुणाला केली दुखापत – सविस्तर बातमी 

तक्रारदार त्याच्या दोन मित्रांसोबत जात असताना त्यांच्या मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून हेल्मेट घातलेला सुमारे २५ ते ३० वर्षांचा अज्ञात व्यक्ती आला. त्याने तक्रारदाराला आपण पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांकडील मोबाइलची माहिती घेतली. आरोपीने तक्रारदाराच्या दोन मित्रांच्या मोबाइलमधील फोन-पे खात्यांद्वारे तक्रारदाराच्या फोन-पे खात्यावर एकूण ३७ हजार ९०० रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले. तक्रारदाराच्या मोबाइलचा पासवर्ड आणि फोन-पेचा पिन क्रमांकही जाणून घेतला. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून तेथून निघून गेला. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४ आणि ३१८(४) नुसार गुन्हा दाखल केला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×