कोयते नाचवित साजरा केला भाई का बड्डे

कोयते नाचवित साजरा केला भाई का बड्डे

लोणी काळभोरमधील गुजर वस्तीवरील घटना

marathinews24.com

पुणे – सार्वजनिक शांततेचा भंग करीत टोळक्याने गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा केला. त्यासोबतच हातातील कोयते हवेत नाचवित भाईचा बड्डेचे सेलिब्रेशन मित्रांच्या अंगलट आले आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी ९ जणांना अटक केली असून, ४ अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. ही घटना १८ डिसेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीनजीक गुजरवस्तीवर घडली.

मनी लॉड्रींग केसच्या नावाखाली ऑनलाईन गंडा – सविस्तर बातमी 

राज रवींद्र पवार असे वाढदिवस साजरा केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. यापुर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात प्रवीण लक्ष्मण नाझीरकर (वय २१) ओम गणेश चव्हाण (वय २०) हर्षल नारायण चव्हाण (वय २१) अनिल मानसिंग होमणे (३० सर्व रा. जेजुरी ) अनिकेत महेश जांभळे (वय २३ रा. खैरेवाडी, पुणे) सौरभ संतोष म्हस्के (वय १९ रा. जेजुरी) अभिषेक महेश जांभळे (वय २५ रा. खैरेवाडी) महेश संपत नाझीरकर (वय १९) सुदाम गुलाब चव्हाण (वय १८ रा. म्हाळुंगे चाकण ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस अमलदार प्रवीण दडस यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज पवार हा गुन्हेगार असून, १८ डिसेंबरला त्याचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याने मित्रांना बोलावून घेत वाढदिवस सेलिबे्रशन केले. त्यावेळी त्याने हातात कोयते घेउन नाचवित व्हिडिओ काढला. त्यासोबतच परिसरातील वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी दखल घेतली. व्हिडिओत दिसणार्‍या ९ जणांना अटक केली. त्यांच्यासोबत असलेल्या चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×