Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडल्याने मजुर जखमी

इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडल्याने मजुर जखमी

ठेकेदाराविरुद्ध पर्वती पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे- नियोजित ‘एसआरए’ वसाहतीतील इमारतीत काम करणारा बांधकाम मजूर १५ व्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली. मजुराच्या सुरक्षेविषयी काळजी न घेतल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची १७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

चैतू बोसाक (सध्या रा. दांडेकर पूल, पर्वती) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ पवन राजेंद्र बोसाक (वय २४, सध्या रा. सर्व्हे क्रमांक २१४, दांडेकर पूल) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम ठेकेदार राज धमेंद्र दास (वय २४, सध्या रा. सर्व्हे क्रमांक २१४, दांडेकर पूल, मूळ रा. मुरवाता बायसी, जि. पूर्णिया, बिहार) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतू बोसाक आणि त्याचा भाऊ पवन मूळचे बिहारचे आहेत. दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी (२२ डिसेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास बांधकाम मजूर चैतू बोसाक पंधराव्या मजल्यावर काम करत होता. त्या वेळी पंधराव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाला.

दुर्घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा बांधकाम मजुराच्या सुरक्षेविषयी उपाययोजना न केल्याचे दिसून आले. तेथे संरक्षक जाळी बसविण्यात आली नव्हती. बांधकाम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×