Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात दारू तस्करांची शक्कल उघडकीस; हजार लीटर दारू जप्त, चौघे अटकेत

पुण्यात दारू तस्करांची शक्कल उघडकीस; हजार लीटर दारू जप्त, चौघे अटकेत

दारू वाहतूक करताना कुंड्या अन झाडांचा घेतला आडोसा

marathinews24.com

पुणे – शहरात गावठी हातभट्टी दारू मिळत नसल्याने तस्करांनी दारु वाहतूक करण्यासाठी कुंड्यासह झाडांचा आधार घेत अनोखी शक्कल लढविली. मात्र, वानवडी पोलिसांनी दारू तस्करांचा डाव ओळखून त्यांच्या वाहनाचा पाठलाग करीत तब्बल १ हजार १५० लीटर हातभट्टी दारूसाठा जप्त केला. त्यांच्याकडील दारूसाठा, टेम्पोसह ५ लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त करीत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

लियाकत रोहीत अब्बासा (वय ३२ रा. सोपानबाग, पुणे ) श्रीकांत बापु साबळे (वय २१ ) संकेत विजय वाबळे ( वय १९ दोघेही रा. सोरतापवाडी) विशाल दुर्योधन संगोडिया, (वय १८ रा. गाडामुडी गाव, यवत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वानवडी पोलीस ठाण्याचे एपीआय उमाकांत महाडिक हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस हवालदार दया शेगर आणि अमोल पिलाणे यांना हातभट्टीची गावठी दारू टेम्पोतून नेली जाणार असल्याची माहिती मिळाली. टेम्पो चालक (एमएच १२ एस. एक्स ४६६८) सोपानबाग घोरपडी परिसरातून जाणार असल्याने पथकाने त्याठिकाणी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. एकहजारांवर लीटर गावठी हातभट्टी जप्त केली. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगीता जाधव, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, अर्षद सय्यद यांनी केली.

दारूच्या तस्करीसाठी शक्कल आली अंगलट

गावठी हातभट्टी शहरात दारु मिळत नसल्यामुळे आरोपींनी यवतमधील दुर्योधन संगोडियाकडुन तयार हातभट्टी गावठी दारुचे कॅन्ड विकत घेतले. टेम्पोतील कॅड कोणालाही दिसु नये म्हणुन, आजूबाजूला कुंड्या आणि झाडांचा आडोसा घेतला. ३५ लीटरचे ३३ कॅड घेउन चौघेजण पुण्याच्या दिशेने निघाले. त्याचवेळी तपास पथकातील चाणाक्ष पोलीस हवालदार दया शेगर आणि अमोल पिलाणे यांना तस्करांची माहिती मिळाली. त्यांनी टेम्पोचा शोध घेउन त्याचा पाठलाग करीत चौघांना ताब्यात घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×