Breking News
शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंगमुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरारपुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरारपुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडारलढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्यामनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडाकुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्रजेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि प्रसार माध्यम कक्ष कार्यपद्धती

मतदान आणि मतमोजणी केंद्रांवरील माध्यमांसाठी प्रवेश, नियम आणि जबाबदाऱ्या

marathinews24.com

पुणे – लोकशाही अधिक बळकट करण्याकरिता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची आहे. निवडणुकांमध्ये माध्यमांचे महत्वपूर्ण भमिका लक्षात घेता त्यांना निवडणुकीच्या काळात माध्यम कक्ष (मीडिया सेंटर), प्रसार माध्यम प्रतिनिधीं व कॅमेरामन यांना मतदान केंद्रात किंवा मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता प्रवेशिका, एकूणच निवडणूक प्रक्रियेविषयी जबाबदारीपूर्वक माहिती देण्यात येते, याबाबत माहिती देणारा लेख पुढीलप्रमाणे :

माध्यम कक्ष :प्रसारमाध्यमांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एकत्रित स्वरूपात माहिती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर संबंधित जिल्हाधिकारी माध्यम कक्षाची स्थापना करतील. माध्यम कक्षाद्वारे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वेळोवेळी निवडणूकविषयक अद्ययावत माहिती वेळोवेळी मिळेल, याची संबंधित जिल्हाधिकारी विशेष दक्षता घेतील.

विद्यार्थ्यांमधील जनजागृती हाच संघटनात्मक संकल्प – सविस्तर बातमी

माध्यम कक्षामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पुरेशी आसन व्यवस्था, इंटरनेटची सुविधा इत्यादी बाबी असतील याची दक्षता घेतील. माध्यम कक्षाची जबाबदारी सांभाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. जिल्हाधिकारी यांनी प्रसंगी स्वतः वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन किंवा प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना निवडणूकविषयक माहितीबाबत अवगत करण्यात येते आणि मतदार जागृतीसाठी प्रसारमाध्यमांनीदेखील स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी : कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने संबंधित मतदार, अधिकारी, कर्मचारी व इतरांना परवानगीशिवाय मतदान केंद्रात किंवा मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यास मनाई असते. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनादेखील प्रवेशिकेशिवाय प्रवेश करता येणार नाही. नगरपरिषदा, नगरपंचायती सार्वत्रिकांसाठी जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या यांच्या मान्यतेने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान व मतमोजणी केंद्रांवर प्रवेशासाठी प्रवेशिका देण्यात येतील.

ऐनवेळी होणारी धावपळ व गोंधळ टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर प्रवेशासाठी द्यावयाच्या प्रवेशिकांकरिता प्रसारमाध्यम संस्थेकडून पुरेशा वेळेपूर्वी अर्ज मागविण्यात येणार आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या दोन प्रती देणे आवश्यक राहील. प्रसारमाध्यम संस्थेकडून प्राप्त झालेल्या अर्जाची योग्यरीत्या छाननी करून पात्र प्रतिनिधीलाच प्रवेशिका देण्यात येईल.

पुढीलप्रमाणे प्रवेशिका देण्यात येतील : राज्य शासनाच्या यादीवरील ‘अ’ (मोठे), ‘ब’ (मध्यम) आणि ‘क’ (लघु) वर्गातील दैनिक वृत्तपत्राच्या प्रत्येकी दोनच प्रतिनिधींना प्रवेशिका दिल्या जातील. राज्य शासनाच्या यादीवरील साप्ताहिकाच्या एका प्रतिनिधीलाच प्रवेशिका देण्यात येईल. उपग्रह वाहिन्यांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना आणि एका कॅमेरामन तसेच भारतीय टपाल खात्याचा परवाना असलेल्या केबल वाहिनीच्या एका प्रतिनिधीला आणि एका कॅमेरामनलाच प्रवेशिका दिली जाईल. प्रवेशिकांची ही संख्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र ‘युनिट’ म्हणून विचारात घेतली जाईल. प्रवेशिकांची संख्या कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार अपवादात्मक स्थितीत आणि सबळ कारणांच्या आधारे जिल्हाधिकारी यांना आहेत. या व्यतिरिक्त (उदा. यूट्यूब चॅनल, ऑनलाईन वृत्तपत्र, संकेतस्थळ, सोशल मीडिया हँडल आदींना) कुठल्याही प्रतिनिधीला किंवा कॅमेरामनला प्रवेशिका देण्यात येणार नाही.

कुठल्याही मतदान केंद्रावर किंवा मतमोणजी केंद्रावर प्रवेशासाठी शासकीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनादेखील (उदा. पीआयबी, डीजीआयपीआर आदी) प्रवेशिकेशिवाय प्रवेश करता येणार नाही. ‘मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रावरील प्रवेशासाठी’ असा स्पष्ट उल्लेख प्रवेशिकेवर असलेल्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशिका देताना नोंदवहीत (रजिस्टर) संबंधित प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या नावाची आणि संपर्क क्रमांकासह संपूर्ण पत्त्याची नोंद घेतल्याची खात्री करणे, हे संबंधित अधिकाऱ्यास अनिवार्य असेल तसेच भविष्यातील संदर्भासाठी नोंदवहीवर (रजिस्टर) संबंधित प्रतिनिधीचे छायाचित्रदेखील चिकटवावे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेली प्रवेशिका रद्द करण्याचे अधिकार यथास्थिती जिल्हाधिकारी अथवा निवडणूक निर्णय अधिकारी अथवा राज्य निवडणूक आयोगास आहेत. कुठल्याही माध्यम प्रतिनिधीने प्रवेशिकेसाठी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे अर्ज करू नये. अशा अर्जाचा राज्य निवडणूक आयोग विचार करणार नाही. ते अर्ज दप्तरी दाखल करण्यात येतील.

मतदान व मतमोजणी केंद्रावरील दक्षता : संबंधित अधिकारी, कर्मचारी प्रवेशिकेची उचित पडताळणी करूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान, मतमोजणी केंद्रावर प्रवेश देतील. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना थेट मतदान केंद्रावरील मतदान कक्षाजवळ जाऊन पाहणी किंवा छायाचित्रण करता येणार नाही तसेच मतदान कक्षाचे छायाचित्रेही घेता येणार नाही.

शांततापूर्ण व शिस्तबद्ध मतदान प्रक्रियेत बाधा पोहचेल, असे कुठलेही वर्तन करता कामा नये. मतदार मतदान करतानाचे छायाचित्र किंवा छायाचित्रण पुरेशा अंतरावरून करणे बंधनकारक असेल. ते करतानाही मतदानाच्या गोपनियतेच्या हक्काचे उल्लंघन होता कामा नये. कुठल्या मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे, हे मतदानाच्या वेळी किंवा मतमोजणीप्रसंगी अपघाताने चित्रित झाल्यास किंवा त्याचे छायाचित्र काढल्यास त्याचे प्रसारण किंवा प्रसिद्धी करता येणार नाही.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान, मतमोजणी केंद्रावर छायाचित्रासाठी किंवा छायाचित्रणासाठी कॅमेराचे स्टँड घेवून जाता येणार नाही. केवळ राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेल्या अधिकृत छायाचित्रकार किंवा कॅमेरामन यांनाच मतदान केंद्रात व मतमोजणी केंद्रात कॅमेरा स्टँड नेता येईल. मतदान किंवा मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची एकाच वेळी होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार गटागटाने सर्वांना आत सोडण्याबाबतचे किंवा परिस्थितीनुरुप नियोजन करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मतदान केंद्राध्यक्ष यांना आहेत.

मतमोजणी केंद्रावरील सुविधा :  जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे असलेल्या यादीतील अधिकृत प्रवेशपत्रधारक प्रसारमाध्यम प्रतिनिधीलाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाईल. प्रसारमाध्यम प्रतिनिर्धीसाठी मतमोजणी केंद्रातच स्वतंत्र पत्रकार कक्षाची व्यवस्था केली जाईल. त्यांना इतरत्र कुठेही फिरण्याची अनुमती नसेल. मतमोजणी केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ किंवा सुरक्षा व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी अथवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असेल. पत्रकार कक्षामध्ये फेरीनिहाय मतमोजणीचे तपशील प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येतील. मतमोजणी केंद्राच्या बाहेरदेखील कर्णाच्या (लाऊड स्पीकर) माध्यमातून किंवा मोठ्या पडद्यावर (स्क्रीन) फेरीनिहाय तपशील आणि अंतिम स्वरुपाचे निकाल सर्वाच्या माहितीसाठी शक्य असेल तिथे उपलब्ध करून दिले जातील.

निवडणुका सुरळीत व सुव्यवस्थित पार पाडण्याच्यादृष्टीने प्रसारमाध्यमांच्या भूमिका महत्वाची आहे, त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे पालन करुन निवडणूक यंत्रणांना सहकार्य करावे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×