Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

LokSamvad 2026 Pune : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; पुणे शहरात ‘लोकसंवाद’ उपक्रमाला प्रारंभ

LokSamvad 2026 Pune

माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम; गुरुजी तालीम व तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळात आयोजन

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ (LokSamvad 2026 Pune) या विशेष जनजागृती अभियानाला पुणे शहरात प्रारंभ झाला. जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या वतीने आज गुरुजी तालीम गणेश मंडळ आणि तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळ येथे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी – सविस्तर बातमी 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने या व्यासपीठाचा उपयोग शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती व्यापक स्वरूपात पोहोचविण्यासाठी करण्यात येत आहे. नागरिकांशी थेट संवाद साधणे, योजनांची माहिती देणे आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

गुरुजी तालीम मंडळात कौशल्य विकास योजनांची माहिती

गुरुजी तालीम गणेश मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ LokSamvad 2026 Pune कार्यक्रमात कौशल्य विकास व रोजगार अधिकारी दिग्विजय जमादार यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. युवकांसाठी उपलब्ध कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगारासाठीच्या योजना तसेच कौशल्याधारित प्रशिक्षणातून रोजगारक्षमता वाढविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

युवकांनी आपली आवड आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन उपलब्ध कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठीच्या शासकीय योजनांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तांबडी जोगेश्वरी मंडळात महिला व बालविकास योजनांची माहिती

तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळ येथे महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिला व बालविकास निरीक्षण गृहाचे अधीक्षक गजानन चाटे यांनी महिला व बालकांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या योजनांचा पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

अधिकृत माहितीचा थेट स्रोत

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांच्या ठिकाणी संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी नागरिकांशी थेट संवाद साधत असून, योजनांची अधिकृत आणि सविस्तर माहिती देत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित विभागाच्या प्रतिनिधींकडून थेट उत्तरे मिळत असल्याने योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध होत आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कौशल्य विकास, सहकार, सायबर सुरक्षा यासह विविध विभागांच्या योजना आणि उपक्रमांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

दि. २४ सप्टेंबरपर्यंत अभियान

‘लोकसंवाद-२०२६’ LokSamvad 2026 Pune हा उपक्रम दि. २४ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभागी होऊन शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×