Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे विज्ञान लेखकांचा सन्मान

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे विज्ञान लेखकांचा सन्मान

कै. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन/ डॉ. दीपक शिकारपूर यांना जीवनगौरव पुरस्कार

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे विज्ञान लेखकांचा सन्मान – महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे १९ जुलैला कै. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनी विज्ञान लेखकांचा सन्मान करणार आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असून डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. विनिता आपटे, डॉ. के. सी. मोहिते यांचा कै. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – सविस्तर बातमी 

पुरस्कार वितरण समारंभ सायंकाळी साडे पाच वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या फिरोदिया सभागृहात आयोजित केला आहे. नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नामवंत शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असून अमेरिकेतील वैज्ञानिक डॉ. अशोक जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सराफ, नूतन विद्याप्रसारक मंडळाचे खजिनदार राजेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी म्हणून डॉ. दीपक शिकारपूर हे राष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. त्यांनी संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान सर्वसामान्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे साहित्यिक योगदान दिले आहे.

त्यांचे लेखन प्रामुख्याने तांत्रिक विषयांना सोप्या भाषेत मांडणे, तंत्रज्ञानाचे फायदे-तोटे समजावून सांगणे आणि डिजिटल युगातील आव्हानांवर प्रकाश टाकणे यावर केंद्रित आहे. याच कार्यक्रमात त्यांच्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (२०२५++)’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. डॉ. शिकारपूर यांचे हे ६३वे पुस्तक आहे. दिलीपराज प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून कै. जयंत नारळीकर यांना हे पुस्तक अर्पण केले आहे.

डॉ. अविनाश भोंडवे हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे, विशेषतः वैद्यकीय लेखन आणि आरोग्यविषयक जागृती यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून सामान्य लोकांसाठी आरोग्यविषयक माहिती सोप्या आणि समजून घेण्यासारख्या भाषेत उपलब्ध करून दिली आहे.

डॉ. विनिता आपटे या ‘तेर’ संस्थेच्या संस्थापक संचालिका असून त्यांनी पर्यावरण जागृती आणि शिक्षणाशी संबंधित लिखाण केले आहे. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे पर्यावरणाचे महत्त्व, हवामान बदल, जलसंवर्धन, वृक्षारोपण, महिलांचे पर्यावरणातील योगदान यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकला आहे.डॉ. के. सी. मोहिते हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता आहेत. वैज्ञानिक संशोधन आणि त्यावरील लेखनाशी संबंधित त्यांचे साहित्यिक योगदान आहे. डॉ. मोहिते हे भौतिकशास्त्र या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी शंभरहून अधिक शोधनिबंध नामांकित जर्नल्स आणि कॉन्फरन्समध्ये प्रकाशित केले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top