Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना

राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना

राज्यस्तरीय निवड प्रक्रियेनंतर निवडलेला १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ जम्मू कश्मीरकडे रवाना

marathinews24.com

पुणे – जम्मू येथील वैष्णो धाम, कालिका धाम येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील मुला-मुलींचा संघ रवाना झाला. या संघाला क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची व्याख्या मार्गदर्शक– डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

यापूर्वी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री विठ्ठलराय जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल, डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतून राष्ट्रीयस्तरासाठी पुढीलप्रमाणे खेळाडूंची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील मुलामध्ये तेजस हर्षद वासणीकर, मयूरेश विवेक सावंत, प्रणव जयदिप घोळकर, रामानुज अमित जाधव आणि वेदांत नागेश खळदे तर १९ वर्षाखालील मुलीमध्ये उर्दी सिद्धार्थ चुरी, अन्वी शैलेश गुप्ते, अनुष्का संदीप पाटील, निहाली निवास पाटील आणि जान्हवी पराग फणसे यांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक अनिल शंकरराव बंदेल, असद अली अब्दुल लतीफ सय्यद तसेच व्यवस्थापक कविता धोंडीराम देसाई आहेत.

याप्रसंगी खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांना जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते गणवेश किटचे वाटप करण्यात आले. क्रीडा अधिकारी अश्विनी शिवानंद हत्तरगे आणि नानासाहेब तलवाडे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×