Breking News
भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावे; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डासिंहगड रस्ता भागात घरफोडी, १ लाखांचा ऐवज चोरीला…ज्येष्ठाचा तिघांनी मिळून केला खून, वानवडीतील घटनापुणे :बेदरकारपणा तरुणाच्या जीवावर बेतलाअजित पवारांकडून दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना सांत्वनस्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाययाचा पर्दापाश, ६ जणींची सुटकादापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटनदुबईला जाऊन केलेली डील फसली, ३ काेटी ७९ लाखांची झाली फसवणुकबारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूरनागरिकांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी शासन प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती येथे बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संलग्नता प्रदान

बारामती येथे बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संलग्नता प्रदान

marathinews24.com

बारामती –  परिचर्या महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय ,बारामती या संस्थेत बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांच्याकडून प्रथम संलग्नता प्रदान करण्यात आली आहे, अशी माहिती परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या सिमा माने यांनी दिली आहे.

सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेनंतर या महाविद्यालयात १०० विद्यार्थी बीएस्सी नर्सिंग करिताप्रवेश घेणार आहेत. सदरचे बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सक्षमता तपासणी करण्यात आली होती.

सदरचे महाविद्यालय सुरु करण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले यांचे मार्गदर्शन लाभले. यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के, उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव , रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांचे सहकार्य लाभले, असेही श्रीमती माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top