Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

वारकऱ्यांसाठी महावितरणची मोबाईल चार्जिंग सुविधा

वारकऱ्यांसाठी महावितरणची मोबाईल चार्जिंग सुविधा

योजनांच्या जनजागृतीसाठी केला चित्ररथ

marathinews24.com

पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरण पुणे परिमंडलाकडून वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची मोफत सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यासाठी महावितरणने दोन वाहनांची व्यवस्था केली असून, यावर महावितरणच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी चित्रफितीही दाखविण्यात येत आहेत.

पुण्यात वाहतूक उपायुक्त डॉक्टरांची तत्परता, वारकर्‍यावर केले उपचार – सविस्तर बातमी

महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी नुकताच आषाढी वारीच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वारी मार्गाचे व सर्व विसावा स्थळांचे ‘वॉक डाऊन’ सर्वेक्षण करुन विद्युत सुरक्षेची चोख उपाययोजना करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी वारी मार्गावर ठिकठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली असून त्यांना रेडियम असलेले रेनकोट देखील देण्यात आले आहेत.

वाहनांवर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना, स्मार्ट सोलार योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना आदी योजनांच्या तसेच स्मार्ट मीटरचे फायदे सांगणाऱ्या चित्रफिती दाखविण्यात येत आहेत. एकावेळी १०० हून अधिक मोबाईल चार्जिंगला लावण्याची सोयही याच वाहनांमध्ये करण्यात आली आहे. यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे व अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते या चित्ररथांचा शुभारंभ करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×